कवठेमहांकाळ : ‘राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये राष्ट्रवादी पक्ष मजबूत करण्यासाठी कामाला लागावे. तसेच, विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे,’ असे मत राष्ट्रवादीचे युवा नेते शंतनू सगरे यांनी व्यक्त केले.
कवठेमहांकाळ येथे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या निवडी पार पडल्या. यावेळी ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. शंतनू सगरे, ज्ञानेश पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोमनाथ टोणे यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांना निवडीची पत्रे देण्यात आली.
शंतनू सगरे म्हणाले की, कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर लढण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नियोजनपूर्वक काम करणे गरजेचे आहे.
ज्ञानेश पाटील म्हणाले की, कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये राष्ट्रवादीचा नूतन पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस बळकट करावी. राष्ट्रवादी पक्षाला तरुणांची रसद पुरवावी.
तालुकाध्यक्ष सोमनाथ टोणे म्हणाले की, कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये आमदार सुमनताई पाटील, अनिताताई सागरे, रोहित पाटील, शंतनू सगरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस वाटचाल करेल.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कवठेमहांकाळ तालुका उपाध्यक्ष पदी रवीकिरण घागरे, आशिष शिंदे, अक्षय पवार, सागर वायदंडे व तालुका सचिवपदी अनिकेत पाटील, गजानन मुळीक, रोहित पाटील, शुभम कारंडे यांची नियुक्ती झाली.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मोहन खोत यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी अमित शिंत्रे, मीनाक्षी माने, सोनू डबीरे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा संघटक अमृत चव्हाण, बालाजी पवार आदी उपस्थित होते