मूळची तुंग येथील असलेली संजना ही आष्टा येथील ज्युनिअर काँलेजची विद्यार्थिनी असून, ती सध्या बारावीत शिकत आहे. मागील तीन वर्षांपासून ती आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच उत्तमराव पाटील कुस्ती केंद्रात सराव करीत आहे. बेल्लारी (कर्नाटक) येथे झालेल्या राष्ट्रीय ज्युनियर स्पर्धैत तिने अनेक चटकदार कुस्त्या करीत कास्यपदक मिळविले. आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी लखनौ येथे होणाऱ्या प्रशिक्षण शिबिरासाठी तिची निवड झाली आहे. विविध राष्ट्रीय स्पर्धांमध्ये तिने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. कुस्ती केंद्रात सरपंच शुभांगी नलावडे यांच्याहस्ते बागडी हिचा सत्कार करण्यात आला.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धैत यश मिळवून कुस्ती केंद्राच्या ऋणातून उतराई होईन, असा विश्वास संजना बागडी हिने व्यक्त केला.
यावेळी आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच उत्तमराव पाटील, भक्ती कुंभार, विष्णू माळी, दीपक पाटील, अमोल पाटील, सचिन मुळे, दिनकर पवार, खंडू बागडी, अवधूत सोनावणे, दीपाली सोनावणे यांच्यासह केंद्रातील पैलवान उपस्थित होते.