शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
2
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
3
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
4
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
7
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
8
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
10
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
11
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
12
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
13
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
14
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
15
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
16
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
17
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
18
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
19
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
20
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...

कुरळप आश्रमशाळा नोंदवहीत केल्या चुकीच्या नोंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 11:06 PM

कुरळप : समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी वारंवार कुरळप आश्रमशाळेस भेट देऊनसुध्दा, शाळेतील विविध सोयी-सुविधांचा अभाव व दिवसेंदिवस शाळेत चालणाºया गैरकारभाराकडे ...

कुरळप : समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी वारंवार कुरळप आश्रमशाळेस भेट देऊनसुध्दा, शाळेतील विविध सोयी-सुविधांचा अभाव व दिवसेंदिवस शाळेत चालणाºया गैरकारभाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करुन शेरेबुकात वस्तुस्थितीची नोंद न केल्यानेच येथे लैंगिक अत्याचाराचा प्रकार घडल्याची खंत पुणे येथे झालेल्या बैठकीत तपास अधिकाºयांनी व्यक्त केली.वीस दिवसांपूर्वी कुरळप आश्रमशाळेत घडलेल्या विद्यार्थिनींच्या लैंगिक अत्याचारप्रकरणी राज्य शासनाने गंभीर दखल घेतली आहे. यासंदर्भात पुणे येथे महिला व बालकल्याण आयुक्तालयात तपास अधिकाºयांची बैठक पार पडली. यामध्ये आश्रमशाळेस वेळोवेळी भेट देणाºया अधिकाºयांना अनेक समस्या लक्षात येऊनही त्यांनी शेरेबुकात वस्तुस्थितीची नोंद न करताच शाळेस सर्व सोयी-सुविधा योग्य असल्याच्या नोंदी केल्याचे अधिकाºयांच्या चौकशीत निष्पन्न झाले. अशा अधिकाºयांना तपास अधिकाºयांनी फैलावर घेत त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली.शाळेस दिलेल्या प्रत्येक भेटीवेळी अनेक दोष आढळूनसुध्दा त्यावर काय कारवाई केली? प्रत्यक्षात विद्यार्थी संख्या व रजिस्टरवर दाखविलेली संख्या यामध्ये तफावत असूनही, या अधिकाºयांनी याची दखल का घेतली नाही? अशा विविध बाबींवर तपास अधिकाºयांनी सवाल उपस्थित केला. नियमानुसार कोणत्याही सुविधा नसताना चांगला शेरा देण्यामागे संबंधित अधिकाºयांची भूमिका कोणती, यावर बैठकीत चर्चा झाली. तसेच संबंधित दोषींवर कडक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला.लैंगिक अत्याचारप्रकरणी समाजकल्याणच्या अधिकाºयांनी संस्थापक अरविंद पवारला सहकार्य केले काय? याची चौकशी करण्याचे सुचविण्यात आले. सध्या ९४ मुली व २२६ मुले वसतिगृहात शिक्षण घेत असल्याचे दाखविण्यात आले आहे. मात्र वस्तुस्थिती वेगळीच आहे. अनिवासी विद्यार्थ्यांना निवासी दाखवून शासनाची फसवणूक करण्यात आली आहे. तसेच चुकीच्या आकडेवारीने आर्थिक लुबाडणूकही केल्याचे पुढे येऊ लागले आहे.या बैठकीस बालहक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे, श्रीमती सीमा व्यास, विजय जाधव, डॉ. शालिनी कराड, संचालक एस. ए. अहिरे उपस्थित होते.महत्त्वाच्या बाबींवर बैठकीत चर्चालैंगिक अत्याचार प्रकरणाच्या तपास अधिकारी पोलीस उपअधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर याही बैठकीस उपस्थित होत्या. त्यांच्याकडूनही तपासाबाबत अनेक महत्त्वाच्या बाबी समितीपुढे मांडण्यात आल्या. तपास समितीच्या म्हणण्यानुसार, दोषींचे निलंबन झाले, तर राज्यातील अनेक आश्रमशाळांना गैरकृत्याच्या कारवाईचा संदेश जाईल आणि आश्रमशाळेविषयी विद्यार्थी व पालक वर्गाचा शिक्षण व सुविधा, सुरक्षितता यावर विश्वास बसेल, असेही मत व्यक्त करण्यात आले.