शिराळा : रेड (ता. शिराळा) वरून निकम मळा-कापरी असा रस्ता मुख्यमंत्री सडक योजनेतून झाला आहे. या रस्त्यावर लावलेले दिशादर्शक फलक पूर्णत: चुकीच्या पध्दतीने लावण्यात आले आहेत. यामुळे वाहन चालकांची गैरसोय होतेच. पण, सूचना फलक लावण्यातही बांधकाम विभागाकडून अनेक चुका झाल्यामुळे नागरिकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.
पहिला फलक उत्तरेच्या बाजूने कापरी फाट्यावर लावला आहे. वास्तविक हा रस्ता शिराळा कापरीला मिळत असल्याने येथे तो हॉर्नचा फलक, हे चुकीचे आहे. हा उलटा लावण्याची गरज आहे. कारण पुढे अंगणवाडी आहे. दुसरा फलक रस्त्यावर विजेचा खांब मध्ये येत असताना तो तसाच रस्ता केल्याने अपघात होत आहेत. कोरोना काळात हा रस्ता मोठे दगड टाकून बंद केला होता. आता तो सुरू आहे. पण दगड तसेच आहेत. येथेही अपघात होत असल्यामुळे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची गरज आहे.