अेाळ : बोरगाव (ता. वाळवा) येथील यशवंत पतसंस्थेतर्फे धैर्यशील पाटील, अरुण पाटील, संभाजी पाटील यांच्या उपस्थितीत ड्राेन प्रदान करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरगाव : आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीला चालना मिळावी, हा उदात्त हेतू डोळ्यांसमोर ठेवून सभासद व शेतकरी यांच्या पाठीशी यशवंत पतसंस्था नेहमी उभी राहिली आहे, असे प्रतिपादन अशोकअण्णा सावकरदादा उद्योग समूहाचे मानद सचिव धैर्यशील पाटील यांनी केले.
बाेरगाव (ता. वाळवा) येथील यशवंत पतसंस्थेच्या वतीने सात लाखांचे अर्थसाहाय्य करून परिसरात औषध फवारणीसाठी ड्रोन प्रदान केला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
धैर्यशील पाटील म्हणाले, शेतकऱ्यांच्या उसावरील लोकरी मावा, उंच व मोठमोठ्या पिकांवर औषधांची फवारणी, तसेच पावसाळ्यात पिकांवर रासायनिक, जैविक औषधे व येणारे रोग यांना आळा घालताना चिखलामुळे अडथळा येताे. या ठिकाणी मानवी यंत्रणा हतबल होत होती. अशा ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून औषध फवारणी सहज शक्य होत आहे. यामुळे यशवंत पतसंस्थेने बोरगाव परिसरात शेतकऱ्यांना ड्रोन उपलब्ध करून दिला आहे.
यावेळी गणेश पाटणकर, पतसंस्थेचे अध्यक्ष अरुण पाटील, उपाध्यक्ष उदयसिंह पाटील, संभाजी पाटील, शिवाजी पाटील, उद्धव शिंदे, शिवाजी पाखले, दिनकर वाटेगावकर, सदानंद शिंदे उपस्थित होते.