कोकरूड : कोकरुड (ता. शिराळा) येथील आराध्यदैवत श्री निनाईदेवी यात्रेस मंगळवार, दि. २९ डिसेंबर रोजी दत्त जयंतीपासून प्रारंभ होत आहे. मात्र कोरोनामुळे ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश देणारी यात्रा व आलीशा बाबा उरूसास १९७० मध्ये तत्कालीन सरपंच प्रतापराव देशमुख यांनी सुरुवात केली. यात्रेचे यावर्षीचे ५० वे वर्ष आहे. मंगळवार, दि. २९ रोजी यात्रेस प्रारंभ होणार होता. १० दिवस चालणाऱ्या यात्रेत अनेक धार्मिक कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन केले जाते. मात्र यावर्षीची यात्रा कोरोनामुळे रद्द करण्यात आली आहे.
कोरोनाची लाट जरी ओसरत असली तरी, भीती कायम आहे. त्यामुळे गर्दी करणारे कार्यक्रम होणार नाहीत. याची काळजी घ्यावी लागणार आहे. यासाठी आम्ही निनाईदेवीची यात्रा न करण्याचा निर्णय घेतल्याचे उपसरपंच पोपट पाटील यांनी सांगितले.