शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

कालचे शत्रू झाले आजचे कट्टर मित्र!

By admin | Published: September 17, 2016 11:34 PM

महापालिकेतील स्थिती : एकमेकांवरील कुरघोड्यांमुळे शहराच्या विकासाचा बाजार

शीतल पाटील -- सांगली --महापालिकेचे राजकारण सध्या इतके गुंतागुंतीचे झाले आहे की, कोण कोणाचा मित्र आणि कोण कोणाचा शत्रू हेही ओळखणे अशक्य आहे. कधीकाळी एकमेकांच्या गळ्यात गळे घालणारे आता विरोधक म्हणवून घेत आहेत, तर एकमेकांना पाण्यात पाहणारे सत्तेचे लाभार्थी झाले आहेत. पालिकेच्या या बिग बझार राजकारणामुळे विकासाचा बाजार झाला आहे. त्यातून सत्ताधारी, विरोधक आणि नगरसेवकांची प्रशासनावरील पकड ढिली होत आहे. त्याचे परिणाम सर्वसामान्य सांगलीकरांना भोगावे लागत आहेत. महापालिकेच्या स्थापनेपासूनच राजकारणाचे वारे सातत्याने बदलले आहे. पण गेल्या दहा वर्षात त्यात वेगाने बदल झाले. मदन पाटील यांच्या चाळीस वर्षाच्या सत्तेला शह देण्यासाठी आमदार जयंत पाटील यांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून विरोधकांची मोट बांधली. राजारामबापू पाटील यांचे शिष्य असलेले संभाजी पवार, शरद पाटील ही मंडळीही एकत्र आली. डाव्या, उजव्या विचारांना एकत्र करून जयंतरावांनी पालिकेची सत्ता हस्तगत केली खरी, पण अल्पावधीतच पालिकेतील महत्त्वाकांक्षी पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या सत्तेलाही सुरूंग लावला. पाच वर्षानंतर पुन्हा मदन पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची सत्ता आली. पण त्यांच्या निधनानंतर मात्र आता अनेकांना पालिकेचे नेतृत्व करण्याची महत्त्वाकांक्षा निर्माण झाली आहे. त्यातून काँग्रेसमध्ये महापौर विरूद्ध उपमहापौर असे गट निर्माण झाले. खऱ्याअर्थाने हे दोन्ही गट नावालाच आहेत. यामागे वसंतदादा घराण्यातील छुपा राजकीय संघर्षच नव्याने समोर येत असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. मदनभाऊ समर्थक विरूद्ध विशाल पाटील समर्थक अशी नवी लढाई पालिकेच्या राजकारणात सुरू आहे. सत्ताधारी काँग्रेसमध्ये शकले झाली असतानाच, इतर पक्षांची अवस्थाही तशीच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर १७ जण निवडून आले. त्यांना सहा अपक्षांनी पाठिंबा दिला. आता चिन्हावर निवडून आलेल्यांपैकी काहीजण दुसऱ्या गटाच्या वळचणीला गेले आहेत, तर पाठिंबा देणाऱ्या अपक्षांपैकी चारजणांनी भाजपला जवळ केले आहे. स्वाभिमानी आघाडीचे ९ सदस्य निवडून आले. त्यातील तीन नगरसेवकांनी भाजप म्हणून स्वतंत्र काम सुरू केले आहे. उर्वरित सहा जणांमध्ये संभाजी पवार समर्थक तीन, तर रिपाइं, मनसे व जनता दलाचा प्रत्येकी एक नगरसेवक आहे. पवार समर्थकांचे नेतृत्व गौतम पवार यांच्याकडे आहे. उर्वरित तीन नगरसेवक सोयीची भूमिका घेतात. वसंतदादा घराणे व संभाजी पवार यांच्यातील राजकीय संघर्ष संपूर्ण जिल्ह्याला माहीत आहे. पण गेल्या वर्षभरात विशाल पाटील व संभाजी पवार समर्थकांची पालिकेत गट्टी जमली आहे. तशी ही युती म्हणे छुपी होती, आता ती उघड झाली आहे.महापालिकेच्या राजकारणात सध्या नीतिमत्तेची चाड कुणालाच राहिलेली नाही. पक्षांतरबंदी कायद्याचा उपयोग झाल्याचे दिसत नाही. पक्षाचा व्हीप, आदेश मोडूनही नगरसेवक काम करू लागल्याने धाक राहिलेला नाही. पक्षाच्या व्यासपीठाचा उपयोग करून नगरसेवकपद उपभोगता येते, पक्षात राहून सत्ताधाऱ्यांना मदत करण्याची खेळी खेळता येते व आपली स्वत:ची पोळी भाजून घेता येते. याशिवाय गेले काही महिने जे सत्तांतर चालले आहे, ते तर भयानक आहे. कोणताच राजकीय पक्ष तत्त्वनिष्ठ राहिलेला नाही. राजकीय पक्षांत सुरू असलेली चढाओढ पाहता, लोकांना त्याची किळस येत आहे. राष्ट्रवादीची : मदनभाऊ गटाला छुपी रसदविशाल पाटील व संभाजी पवार यांच्यातील नव्या युतीमुळे काँग्रेसमधील मदन पाटील गट एकाकी पडला होता. पण या गटाच्या मदतीला राष्ट्रवादी काँग्रेस धावून येत आहे. जिल्हा बँक व मार्केट कमिटीच्या निवडणुकांत राजकीय प्रतिस्पर्धी असलेले जयंत पाटील व मदन पाटील एकत्र आले होते. मदनभाऊंच्या पश्चात राष्ट्रवादीने या गटाला कधी उघड, तर कधी छुपी रसद पुरविली आहे. त्यामुळेच पालिकेतील मदनभाऊ गटाची वाटचाल आजअखेर सुकर झाली आहे.अधिकाऱ्यांचे विकास कामांकडे दुर्लक्षराजकीय पक्षांतील कुरघोड्यांमुळे प्रशासनाचे मात्र फावले आहे. एकमेकांवर ढकलून, कामच न करण्याची प्रवृत्ती अधिकाऱ्यांत वाढत आहे. एखादा विषय मंजूर झाला तरी, कोणी विरोध केला म्हणून त्याची अंमलबजावणी लांबणीवर टाकली जात आहे. यातून सर्वसामान्य जनतेला मात्र त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील पाणीपुरवठा, ड्रेनेज योजनेची वाट लागली आहे. रस्ते खड्डेमय झाले आहेत. स्वच्छता, कचरा उठाव दिसत नाही. गटारी तुंबल्या आहेत. डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. अशा कित्येक समस्या पालिकेसमोर आव्हान बनून आहेत. पण राजकीय संघर्षामुळे प्रशासनाला जाब विचारण्याची सत्ताधारी, विरोधकांची हिम्मतच संपली आहे. प्रशासनावरील पकड ढिली झाल्याने नागरी समस्या जैसे थेच आहेत.