-------
ऑफलाइन सभेची मागणी
सांगली : सोलापूर महापालिकेची महासभा ऑफलाइन झाली. त्याच धर्तीवर सांगली महापालिकेची सभाही ऑफलाइन व्हावी, अशी मागणी भाजपच्या नगरसेवकांकडून करण्यात येत आहे. सध्या शासनाने महापालिकेला ऑनलाइन सभा घेण्याचे निर्देश दिले आहेत.
----------
आयर्विन पुलावर हुल्लडबाजांना आळा घालावा
सांगली : सध्या कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे आयर्विन पुलावरून नदीत उडी घेऊन स्टंटबाजी करण्याचे प्रकार सुरू आहेत. या हुल्लडबाजांवर गुन्हे दाखल करून, त्यांना आळा घालण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
----------
आयर्विन पुलावरील दिवे बंद
सांगली : महापालिकेच्या वतीने आयर्विन पुलावर दिवे बसविण्यात आले आहेत. त्यातील चार दिवे सुरू आहेत, तर उर्वरित दिवे बंद आहेत. त्यात आयर्विनच्या दुरुस्तीचे कामही सुरू असल्याने, हे दिवे तातडीने सुरू करण्याची मागणी होत आहे.