शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
5
२५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
6
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
7
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
8
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
10
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
11
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
12
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
13
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
14
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
16
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
17
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
18
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
19
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?

तुम्ही माझे घर फोडले, मी शिंदे-फडणवीस युती तोडून दाखवितो; शशिकांत शिंदेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2023 7:21 PM

भाजपकडे स्वतःची ताकद नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांना आयात करून त्यांनी पक्ष वाढवला

विटा : भाजपकडे स्वतःची ताकद नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांना आयात करून त्यांनी पक्ष वाढवला आहे. आज त्यांनी माझ्या भावाला पक्षात घेऊन माझे घर फाेडले आहे. लवकरच मी शिंदे-फडणवीस युती ताेडून दाखवताे, असा इशारा माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी विटा येथे दिला.विटा येथे रविवारी खानापूर तालुका राष्ट्रवादीच्या बुथ कमिटी पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला. यावेळी शिंदे बोलत होते. यावेळी आमदार अरुण लाड, माजी आमदार सदाशिवराव पाटील, जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक, सरचिटणीस बाळासाहेब पाटील, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, ॲड. संदीप मुळीक, विधानसभा क्षेत्राध्यक्ष सुशांत देवकर, तालुकाध्यक्ष किसन जानकर, हर्षवर्धन बागल, शहराध्यक्ष अविनाश चोथे उपस्थित होते.शिंदे म्हणाले, देशातील विरोधी पक्षाची मोट बांधण्याचे काम फक्त शरद पवार करू शकतात. ही लढाई सोपी नाही. सत्तेतील लोक निवडणुका जिंकण्याचे अनेक फंडे वापरत असतात. अनेक राज्ये त्यांनी सत्तेच्या माध्यमातून घेतली. हे चित्र बदलायचे असेल तर सांगलीचा खासदार आपल्या विचारांचा असला पाहिजे. त्यासाठी तयारीला लागा. बुथ कमिट्या सक्षम करा.

अरुण लाड म्हणाले, सदाशिवराव पाटील यांची संघटनात्मक ताकद मोठी आहे. त्यांची सुप्त ताकद जागृत केली पाहिजे. त्यासाठी बूथ कमिटी सक्षम करण्याची गरज आहे.माजी आमदार सदाशिवराव पाटील म्हणाले, दोन वेळा मी आमदार होतो, दोनदा पराभव झाला. पुढची निवडणूक योग्य वेळी, योग्य पद्धतीने करू. आमच्याकडून पक्ष संघटनेला कोणताही त्रास होणार नाही याची खबरदारी घेत आहोत. परंतु तुम्हाला विश्वास देण्यात आम्ही कमी पडतोय की आमच्यावर विश्वास ठेवण्यात तुम्ही कमी पडताय? याचा विचार झाला पाहिजे.

जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, कार्याध्यक्ष ॲड. बाबासाहेब मुळीक, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, सुशांत देवकर यांनी मनाेगत व्यक्त केले.

आज आटपाडी, विसापूर सर्कलमध्ये पक्षाचे काय चालले आहे? आटपाडी सरळ करू शकला तरच पुढचा आमदार राष्ट्रवादीचा होईल. अन्यथा अपेक्षा ठेवू नका. विसापूर सर्कलमध्ये समन्वय ठेवा म्हणून तीन वर्षांपासून सांगतोय. ते आले तर ठीक, नाही तर निर्णय घ्यावा लागेल, असे परखड मत सदाशिवराव पाटील यांनी व्यक्त केले.

टॅग्स :SangliसांगलीEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShashikant Shindeशशिकांत शिंदे