सांगली : सुधार समितीने रस्ते व नागरी समस्यांच्या कामातील भ्रष्टाचाराचा पोलखोल सुरु केल्याने महापौरांचा तोल ढासळला आहे. तुम्ही भ्रष्टाचार करणे थांबवा, आम्ही स्टंटबाजी थांबवतो, असा टोला समितीचे कार्याध्यक्ष अॅड. अमित शिंदे व प्रा. आर. बी. शिंदे यांनी गुरुवारी पत्रकार बैठकीत लगावला.ते म्हणाले की, सुधार समितीच्या आंदोलनांमुळे महापालिका क्षेत्रात रस्त्यांची कामे सुरु झाली आहेत. गेली साडेचार वर्षे रस्ते खराब असल्याचे महापौरांना दिसले नाही काय? निकृष्ट दर्जाची कामे करून लोकांच्या तोंडाला पाने पुसण्याचा उद्योग सुरु आहे. कामाचे फलक लावले नाहीत. सह्याद्रीनगरचे काम कसे बनावट चालू आहे, त्याचा समितीने अधिकाºयांच्या समक्ष जाहीर पंचनामा केला आहे. तो पंचनामा अधिकाºयांनी देखील मान्य केला. त्याला स्टंटबाजी कोणत्या आधारावर म्हणता?, असा सवाल त्यांनी केला. सुधार समितीने कोणते काम बंद पाडले, ते महापौरांनी दाखवावे. फौजदारी करणार, अशी बालिश वक्तव्ये महापौरांनी करू नयेत. त्यांनी गुन्हा दाखल करून दाखवावा, असेही आव्हान त्यांनी दिले.समक्ष पाहणी करावीसह्याद्रीनगर येथील रस्त्याच्या कामाची अधिकाºयांसह पाहणी केली असता, त्यात तथ्य आढळून आले. या रस्त्याची महापौरांनी शुक्रवारी सकाळी १० वाजता समक्ष पाहणी करावी आणि काम कसे चालू आहे ते जाहीर करावे, असे आव्हान समितीने दिले.
तुम्ही भ्रष्टाचार थांबवा, आम्ही स्टंटबाजी बंद करू अमित शिंदे : महापौरांचा तोल ढासळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 12:03 AM