शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
3
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी सर्वात कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
5
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
8
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
9
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
10
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
11
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
12
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
13
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
14
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
15
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
16
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
17
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
18
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

VidhanSabha Election 2024: तासगाव-कवठेमहांकाळला यंग ब्रिगेड मैदानात; दुरंगी की तिरंगीवर ठरणार फैसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2024 18:24 IST

अजितराव घोरपडे यांची भूमिका निर्णायक 

दत्ता पाटीलतासगाव : तासगाव-कवठेमहांकाळविधानसभा मतदारसंघात यंदा यंग ब्रिगेड मैदानात उतरणार आहे. मात्र, ही लढत दुरंगी की तिरंगी होणार, यावर निवडणुकीतील विजयाचा फैसला होणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून रोहित पाटील रिंगणात निश्चित झाले आहेत. भाजपचे प्रभाकर पाटील रिंगणात निश्चित असले, तरी महायुतीच्या जागावाटपाच्या फॉर्मुल्यात त्यांची उमेदवारीचे थांबली आहे. माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांची भूमिका यावेळी निर्णायक ठरणार आहे.लोकसभा निवडणुकीत तासगाव-कवठेमहांकाळ मतदार संघात मोठी उलथापालथ झाली. होमग्राऊंड असूनही या मतदारसंघात भाजपचे माजी खासदार संजय पाटील पिछाडीवर पडले. तत्कालीन राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी पहिल्यांदाच संजय पाटील यांच्या विरोधात भूमिका घेतली. त्यामुळे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. शरद पवार गटाकडून आमदार सुमनताई पाटील यांच्याऐवजी त्यांचे पुत्र रोहित पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.भाजपचे माजी खासदार संजय पाटील यांचे पुत्र प्रभाकर पाटील देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी सज्ज आहेत. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या सोशल मीडियावर पक्ष आणि चिन्ह दिसत नाही. महायुतीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यात हा मतदारसंघ राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते अजित पवार गटात जातील, अशी चर्चा आहे. परंतु, कोणत्या पक्षातून रिंगणात उतरणार हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र, प्रभाकर पाटील विरुद्ध रोहित पाटील यांची लढत निश्चित मानली जात आहे.दोन्ही उमेदवार तासगाव तालुक्यातील आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील कवठेमहांकाळ तालुक्यातील नेतृत्व अजितराव घोरपडे यांचीही भूमिका निर्णायक ठरणार आहे. अद्याप घोरपडे यांनी निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केलेले नाही. तरी पडद्याआड घोरपडे गटाच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. त्यामुळे घोरपडे यांचे पुत्र राजवर्धन ऐनवेळी रिंगणात उतरणार का ? त्यांच्या भूमिकेची उत्सुकता आहे. त्यावरच निवडणुकीतील विजयाची गणिते ठरणार असल्याचे सध्याचे चित्र आहे.

तिसऱ्या पर्यायाची तयारी..राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून जिल्हा बँकेची माजी संचालक प्रताप पाटील, तर ‘वंचित’कडून वंजारवाडीचे सरपंच अरुण खरमाटे यांनी मोर्चेबांधणी सुरू आहे. ‘मनसे’कडून अमोल काळे यांनी तयारी सुरू केली आहे. त्यामुळे तासगाव कवठेमहांकाळच्या राजकीय घडामोडीविषयी मतदारांना उत्सुकता आहे.

२०१९ निवडणूक

  • सुमनताई पाटील - १,२८,३७१
  • अजितराव घोरपडे - ६५,८३९

सध्याचे मतदान 

  • एकूण मतदार - ३,११,३४०
  • पुरुष मतदार - १,५८,५३७
  • स्त्री मतदार - १,५२,७९९
  • तृतीयपंथी - ४
टॅग्स :Sangliसांगलीtasgaon-kavathe-mahankal-acतासगाव-कवठेमहांकाळvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024Rohit Patilरोहित पाटिलNCPराष्ट्रवादी काँग्रेस