जत : जत शहरालगत असलेल्या कडीमळा येथील संतोष महादेव वाघमोडे (वय १९, रा. कडीमळा जत) याचा विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू झाला. दोन मित्रांसमवेत ताे विहिरीत पोहण्यासाठी गेला हाेता. ही घटना बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या दरम्यान घडली. या प्रकरणी जत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष वाघमोडे याला पोहता येत होते. बुधवारी दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान ताे दोन मित्रांना घेऊन भावकीतील सुखदेव वाघमोडे यांच्या विहिरीत पोहण्यासाठी गेला होता. ओढ्याकाठी असलेली सुमारे पन्नास फूट खाेल विहीर काठोकाठ पाण्याने भरलेली आहे. विहिरीच्या काठावरून पाण्यात सूर मारल्यानंतर पाण्याखालील सबमर्सिबलची केबल व विद्युत मोटरला बांधलेल्या नॉयलॉन दोरीमध्ये डोके अडकल्याने गुदमरून त्याचा मृत्यू झाला. संतोषचा अचानक मृत्यू झाल्यामुळे कडीमळा परिसरात हळहळ व्यक्त हाेेत आहे. जत पाेलीस ठाण्यात घटनेची नाेंद झाली असून तपास हवालदार एस. ए. कणसे तपास करीत आहेत.
फोटो : २१ संताेष वाघमाेडे