करगणी : युवकांच्या विचारावर सध्या देशाचे भवितव्य अवलंबून असून सकारात्मक राजकारणासाठी सध्या देशाला युवकांची गरज आहे. चालू घडामोडीवर लक्ष ठेवून युवकांनी कृषी कायद्याचा अभ्यास करावा, मगच सोशल मीडियात व्यक्त व्हावे, असा सल्ला आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला.
शेटफळे (ता. आटपाडी) येथे आयोजित रक्तदान शिबिर कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार पडळकर म्हणाले, सध्या राजकारणात युवकांची गरज असून कोणत्याही पक्ष किंवा नेत्याच्या नेतृत्वाखाली काम करताना सकारात्मक राजकारण करण्यासाठी युवकांनी पुढे यावे. युवकांनी आपली ताकद दाखवून देणे गरजेचे आहे. यासाठी सध्या घडत असणाऱ्या घडामोडीवर युवकांनी लक्ष केंद्रित करून चांगल्या विचारांचे राजकारण करावे.
यावेळी ऋषिकेश पाटील, हरिशेठ गायकवाड, दत्तात्रय गायकवाड, महादेव गायकवाड, अनिता पाटील आदींसह मान्यवर उपस्थित होते.