लोकमत न्यूज नेटवर्कशिराळा : औंढी (ता. शिराळा) येथील शिवणी धरणात पोहण्यास गेलेल्या अभिषेक शांताराम जंगम (वय २४, रा. शिराळा) या तरुणाचा आपल्या मामेभावास वाचविताना पाण्यात बुडून मृत्यू झाला. दुपारी आपल्या बहिणीचा विवाह समारंभ पार पाडून आलेल्या अभिषेकच्या दुर्दैवी मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना रविवारी सायंकाळी ५.३० च्या दरम्यान घडली.याबाबत शिराळा पोलिस व घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, अभिषेक याच्या सख्ख्या बहिणीचा सरुड (ता. शाहुवाडी, जि. कोल्हापूर) येथे रविवारी दुपारी १२.३० वाजता विवाह होता. दहा वर्षापूर्वी अभिषेकच्या वडिलांचे निधन झाले आहे. घराची सर्व जबाबदारी अभिषेकवरच होती. आपल्या बहिणीचा विवाह समारंभ पार पाडून अभिषेक व त्याचे पाहुणे मयूर जंगम, राहुल जंगम, शुभम पोवेकर हे चार वाजण्याच्या सुमारास शिराळ्यात आले. त्यानंतर सर्वजण शिवणी (औंढी, ता. शिराळा) गावामध्ये धरणात अंघोळीसाठी गेले होते. अभिषेकच्या पश्चात आई, लहान भाऊ व विवाहित बहीण असा परिवार आहे. याबाबत सचिन देवीदास पोवेकर यांनी शिराळा पोलिस ठाण्यात वर्दी दिली असून अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्नील घोंगडे हे करीत आहेत.मामेभावाला वाचविताना दुर्घटनासरूडहून शिराळ्याला परतल्यानंतर सर्वजण धरणात पोहण्यासाठी उतरले. यावेळी मामाचा मुलगा मयूर जगन्नाथ जंगम हा पाण्यात बुडत असल्याचे पाहून अभिषेक त्यास पाण्यात उतरुन वाचविण्यासाठी गेला. मात्र तो स्वत:च पाण्यात बुडाला. इतर युवकांनी मयूरला पाण्यातून बाहेर काढले. मामाच्या मुलास वाचविण्यासाठी पाण्यात गेलेल्या अभिषेकला मात्र ते वाचवू शकले नाहीत.
शिवणी धरणात तरुण बुडाला
By admin | Published: May 07, 2017 11:58 PM