०२ आरग फोटो ०१
आरग (ता. मिरज) येथे आदित्य मिरखेलकर यांनी महिला सुरक्षिततेविषयी मार्गदर्शन केले. यावेळी सागर वडगावे, प्रदीप शहा, कलगौंडा पाटील आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
लिंगनूर : युवतींनी बौद्धिकदृष्ट्या सक्षम होण्याबरोबरच शारीरिकदृष्ट्याही बलशाली होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यातील प्रशिक्षणार्थी अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी केले. आरग (ता. मिरज) येथे युवतींना कराटेचे प्रशिक्षण देणाऱ्या केपी बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होेते. उद्योग सागर वडगावे, व्यावसायिक प्रदीप शहा, शिवसेनेचे सांगली शहर प्रमुख महेंद्र चंडाळे यावेळी उपस्थित होते.
मिरखेलकर म्हणाले की, महिलांच्या संरक्षणासाठी पोलीस दल सक्षम आहे, पण प्रत्येक ठिकाणी पोलीस पोहोचू शकत नाहीत. अशावेळी स्वत:ची सुरक्षितता राखण्यासाठी तरुणींनी कौशल्ये आत्मसात करायला हवीत. कराटेसारख्या खेळांचे प्रशिक्षण घ्यायला हवे. शासन आणि पोलिसांनी महिला सुरक्षिततेसाठी अनेक मोबाईल ॲप्लिकेशन्स उपलब्ध केली आहेत, त्यांचाही वापर करायला हवा.
यावेळी संस्थेचे संचालक कलगौंडा पाटील यांनी मिरखेलकर यांचा सत्कार केला. कार्यक्रमाला रंगावलीकार आदमअली मुजावर, अमोल वडगावे, बी. आर. पाटील, वसंत कोरबू, मारुती माळी आदी उपस्थित होते.
---------------------------