लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : नियम तोडूनही जर वाहतूक पोलिसांच्या तावडीतून तुम्ही सुटलात तरीही तुमच्या नावे दंडाची पावती फाडली जाऊ शकते. ई-चलनद्वारे तुमच्या वाहनावर दंड ठोठावल्याची नोंद होते. त्यामुळे तुमच्या वाहनावर असा एखादा दंड तर नाही ना, याची खातरजमा करुन घ्यावी. बऱ्याचदा नियम मोडूनही आपण दंडापासून वाचल्याची भावना मनात निर्माण होते. त्यानंतर पुन्हा नियम मोडण्याचेही धाडस असे वाहनधारक करु शकतात. त्यामुळे एखाद्या वाहनावर अनेकप्रकारचे दंड लागू शकतात. मोठी कारवाई होण्यापूर्वीच याबाबत जाणून घ्यायला हवे.
कोट
वाहनधारकांनी नियमभंग केल्यास तातडीने त्यांच्यावर कारवाई होते. यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करुन ई-चलन तयार होते. वाहनधारकांनीही विनाविलंब ई-चलनावरील दंडाची रक्कम भरावी.
- प्रज्ञा देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा
चौकट
वर्षाला इतका होतोय दंड (रुपये)
धोकादायकपणे वाहन चालविणे २७,४५,०००
विनाहेल्मेट १,८१,०००
ट्रीपल सीट २०,६७,२००
नो एंट्री, वन वे १४,१९,८००
चौकट
वाहनावर दंड आहे का, या ॲपवर शोधा
महाट्रॅफिक या ॲपवर किंवा संकेतस्थळ ओपन करावे.
वाहनाची माहिती त्यावर टाकून शोधल्यास दंड दिसून येतो.
दंड नसेल तर वाहनासमोर ‘नो डाटा फाऊंड’ असा मेसेज दिसतो.