शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
2
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
3
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
4
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
5
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
6
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
7
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
8
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
9
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
10
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
11
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
12
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
13
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
14
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
15
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
16
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
17
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
18
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
19
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
20
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी

सावधान! तुमचा आवाज चोरून केले जाऊ शकते बँक खाते साफ, ‘एआय’च्या माध्यमातून गंडा घालण्याचे प्रकार 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 5:54 PM

फसवणूक होऊ नये म्हणून काय काळजी घ्याल?

शरद जाधव सांगली : अनोळखी क्रमांक... त्यावरून आलेल्या ओळखीच्या, कुटुंबातील सदस्याचा कॉल... विश्वास ठेवून आपली वैयक्तिक काही माहिती देत असाल तर थोडे थांबा... एआय (आर्टिफिशियल इंटिलिजंट)च्या माध्यमातून हुबेहूब आवाज काढून बँक खात्याची, पिन आणि ओटीपीविषयक माहिती घेऊन गंडा घालण्याचे प्रकार आता होत आहेत. फसवणुकीचा हा नवीन फंडा अनेकांना माहीत नसल्याने यात फसवणूक होण्याचीच शक्यता अधिक आहे.बँकेतून बोलत असल्याचे सांगत, लिंक पाठवून ती ओपन करण्यास सांगून, तर कधी थेट मोबाइल क्रमांकच हॅक करून फसवणुकीचे प्रकार घडले आहेत. सायबर पोलिसांकडून याबाबत प्रबोधन करण्यात येत असल्याने आता जनतेतही याबाबत थोडीफार तरी सजगता दिसून येते. मात्र, आता वेगाने वाढत असलेल्या ‘एआय’चा वापर करून घेत आता ऑनलाइन गंडा घालणारे फसवणुकीचे प्रकार करत आहेत.

काय आहे व्हॉइस क्लोन फ्रॉड...?एआयच्या माध्यमातून हुबेहूब आवाज काढून ही फसवणूक केली जाते. यात अनेकदा आपल्याच कुटुंबातील आवाज घेतला जातो. व्हाइस रेकॉर्डिंगसह अन्य मार्गांनी हा ‘व्हाइस’ मिळवला जातो. आपल्याच घरातील व्यक्ती बोलत आहे असे समजून अनेकजण बँकेसह इतर वैयक्तिक माहिती, पिन क्रमांक, ओटीपी काही क्षणात देतात आणि काही क्षणातच बँकेतून पैसे हडप केले जातात.

अनोळखी क्रमांकांवरून कॉल आल्यास...अनेकदा अनोळखी क्रमांकावरून फोन आल्यास अनेकजण आपली माहिती देतात. आपल्या कुटुंबातील, परिचित व्यक्तीचा आपल्याकडे सेव्ह असलेला क्रमांक सोडून अशा अनोळखी क्रमांकावरून कॉल आल्यास त्यावर शहानिशा करूनच माहिती द्यावी, अन्यथा काहीही संभाषण करू नये.

फसवणूक होऊ नये म्हणून काय काळजी घ्याल?

  • बँकेची कोणतीही माहिती बँक मोबाइलवरून मागत नसते. त्यामुळे कोणालाही ही माहिती देऊ नये.
  • कोणत्याही क्रमांकावरून आलेली लिंक ओपन करू नये.
  • अनोळखी व्यक्तीशी संभाषण करताना काळजी घ्यावी.
  • ऑनलाइन माध्यमातून फसवणुकीचे नवनवीन प्रकार सुरू आहेत. त्यामुळे मोबाइलचा वापरावेळी काळजी घ्यावी.

वेगवेगळ्या पद्धतीने सध्या फसवणूक केली जात आहे. सायबर गुन्हे आणि त्यापासून बचावासाठी नागरिकांनी स्वत: सतर्क राहणे आवश्यक आहे. त्यामुळे अनोळखी क्रमांकावर संवाद साधणे, त्यांना आपली कोणतीही माहिती देऊ नये. - संजय हारुगडे, पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे

टॅग्स :SangliसांगलीfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी