जत : जत तालुक्यातील डफळापूर येथील तेजश जयसिंग भोसले (वय २१) या युवकाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज, बुधवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. मृत तेजश हा ट्रॅक्टर चालक व शेती करीत होता. घरातील सर्व मंडळी झोपी गेल्यानंतर तो घरातून बाहेर पडला. डफळापूर पासून जवळच जाईवगळ चव्हाण वस्तीजवळ स्वत:च्या शेतामध्ये झाडाला गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. त्याचा मृतदेह सकाळी झाडास लटकताना आढळून आला. याबाबत त्याच्या चुलत मामांनी जत पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय पाठवला. त्याच्या पश्चात आई, भाऊ व विवाहित बहीण असा परिवार आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. अधिक तपास पोलिस करीत आहेत.
सांगलीतील डफळापुरात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या, नेमके कारण अस्पष्ट
By श्रीनिवास नागे | Updated: July 5, 2023 12:59 IST