शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

युवक हो... करिअरला मिळणार योग्य दिशा

By admin | Published: May 24, 2017 11:34 PM

युवक हो... करिअरला मिळणार योग्य दिशा

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : युवकांच्या करिअरविषयक अनेक प्रश्नांसाठी अचूक उत्तर असलेले ‘लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर’ हे शैक्षणिक प्रदर्शन सांगली येथे २६ व २७ मे रोजी आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनात नामांकित शैक्षणिक संस्थांची इत्यंभूत माहिती एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे. शिवाय विद्यार्थी, विद्यार्थिनींना त्यांच्या करिअरचे मार्ग सापडण्यास मदत होणार आहे. आपल्या पाल्यांनी कोणता कोर्स करावा, दर्जेदार शिक्षण देणारी संस्था कोणती, सर्व शैक्षणिक संस्थांची माहिती घेण्यासाठी किती फिरावे लागणार, वर्षाला किती शुल्क भरावे लागणार, अनुदान मिळणार का, असे अनेक प्रश्न पालकांसमोर उभे राहतात. हे लक्षात घेऊन ‘लोकमत’ समूहाने ‘अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर’ हे शैक्षणिक प्रदर्शन आयोजित केले आहे. शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात नेहमीच पुढाकार घेणाऱ्या ‘लोकमत’ समूहातर्फे यंदाही २६ व २७ मे रोजी सांगलीत राममंदिर चौकातील कच्छी जैन भवन येथे ‘लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर २०१७’चे आयोजन केले आहे. पालक आणि विद्यार्थी यांच्या मनात करिअर व शिक्षणविषयक अनेक शंका असतात. त्या शंकांचे निराकरण आणि प्रश्नांना अचूक उत्तरे या प्रदर्शनात मिळणार आहेत. शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ लोक यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. एकाचठिकाणी शैक्षणिक माहितीचा खजाना उपलब्ध होणार असल्याने पालक, विद्यार्थ्यांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे. एकाचठिकाणी हजारो विद्यार्थी व पालकांपर्यंत आपल्या शैक्षणिक संस्थेची माहिती पोहोचविता येणार आहे. प्रत्येकाशी वैयक्तिकरित्या संवाद साधून आपल्या उपक्रमाची माहिती देता येणार आहे. डायस अकॅडमी हे अ‍ॅस्पायर-२0१७ चे सहप्रायोजक आहेत. महाविद्यालय, मेडिकल, इंजिनिअरिंग आर्किटेक्ट, फॅशन, आयटीआय यासह विविध क्षेत्रातील करिअरविषयक माहिती येथे मिळेल. या प्रदर्शनाचा लाभ जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी व पालकांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी ‘लोकमत’ भवन, कलाश्री आर्केड, राम मंदिर चौक, सांगली येथे तसेच दत्ता ८३९0६२८८२१, अर्चना ९0२८४४७९४७ यांच्याशी संपर्क साधावा. दोन दिवस भरगच्च कार्यक्रमदुपारी १२.३0 ते १.३0 वा. दहावी ते पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी जनरल नॉलेज (सामान्य ज्ञान) लेखी स्पर्धा. दुपारी १.३0 ते २.३0 इंजिनिअरिंंग आणि मेडिकलची तयारी करणारे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांशी संवाद उंल्ल क ळङ्म क उंल्ल या विषयावर मार्गदर्शन. वक्ते : शैलेश नामदेवदुपारी ३.३0 ते ४.३0 उद्घाटन समारंभ/खएए उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार हस्ते खा. संजयकाका पाटीलसायंकाळी ५.३0 ते ६.३0 दहावी ते पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ‘सांगली सायन्स आयडॉल’ लेखी स्पर्धा. कार्यक्रमात जनरल नॉलेज, सायन्स आयडॉल, चॅम्पियन आॅफ द मॅथ्स या स्पर्धेतील विजेत्यांना रोख बक्षिसे. २७ मे २0१७सकाळी ११ ते १ वा. १६ ते ३0 वयोगटातील युवक आणि युवतींसाठी ‘लोकमत फॅशन आयडॉल’ ही स्पर्धा दुपारी २ ते ३ दहावी ते पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी .उँेंस्र्रङ्मल्ल डा ३ँी टं३ँ२ या लेखी स्वरूपातील स्पर्धा.दुपारी ३.३0 ते ४.३0 ‘विद्यार्थी आणि पालक’ चर्चासत्र. मार्गदर्शन : डॉ. प्रदीप पाटील. सायंकाळी ५ ते ६ खीी टं्रल्ल & ठीी३ अे्रि२२्रङ्मल्ल ढ१ङ्मूी२२ या विषयावर मार्गदर्शन : श्रीनिवास राव सायंकाळी ६ वाजता समारोप समारंभ. जि. प. अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे.८ जीबी पेनड्राईव्ह भेटवस्तूअ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअरमध्ये प्रत्येक तासाला एका लकी विद्यार्थ्याला ८ जीबी पेनड्राईव्ह तसेच मुली/महिलांसाठी इमिटेशन ज्वेलरी जिंकण्याची संधी मिळणार आहे. कार्यक्रमस्थळी मोफत वाय-फाय सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.