शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

तरुण वळला शेती, दुग्ध व्यवसायाकड

By admin | Published: December 11, 2014 10:46 PM

म्हैसाळ परिसरातील चित्र : शिक्षणाचा आधुनिक शेतीसाठी उपयोगे

सुशांत घोरपडे- म्हैसाळ -शासकीय खात्यातील रिक्त जागा सुशिक्षित बेरोजगारांच्या तुलनेत कमी असल्याने आता सुशिक्षित बेरोजगार खासगी नोकरीपेक्षा शेती व दुग्ध व्यवसायाला पसंती देत असल्याचे चित्र म्हैसाळ, नरवाड, विजयनगर, ढवळी, वड्डी या ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे.पूर्वीच्या काळी मुलगा पदवीधर झाला की त्याला नोकरी मिळत होती. सरकारने सर्व शिक्षण अभियान सुरू केले व जास्तीत जास्त मुला-मुलींना सुशिक्षित करण्याचा प्रयत्न केला व तो यशस्वीही झाला. पण त्यांना आवश्यक असणारे उद्योगधंदे व नोकऱ्या याकडे मात्र सरकारने पाठ फिरवली. मग ही जबाबदारी सरकार घेणार की नाही? हा खरा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे. आज खासगी कंपनीत नोकरीला लागल्यावर त्याला तुटपुंज्या वेतनावर काम करावे लागते. म्हणजे त्याचा पगार शेतात काम करणाऱ्या मजुरापेक्षाही कमी असतो व मानसिक संतुलन राहत नाही, असा समज या सुशिक्षित बेरोजगारांचा झाला आहे.या कारणामुळे अनेकजण शेती व दुग्ध व्यवसायाकडे वळल्याचे चित्र आहे. काही तरुण आपली शेती उत्तमरित्या करत आहेत, तर काहीजण शेतामध्ये रोजगार करणे पसंत करीत आहेत. शेतीमध्ये ऊस, द्राक्षे, केळी ही पिके या परिसरात मोठ्या प्रमाणावर येतात. या पिकांचे उत्पन्न जास्त असल्यामुळे मजुरांना शेतकऱ्यांकडून चांगला पगार दिला जातो. तसेच दुग्ध व्यवसाय हा शेती व मजुरी करीत करता येतो. यासाठी या तरुणांना सोसायट्या कर्जे उपलब्ध करून देतात व त्या सोसायट्यांमार्फत जनावरांना खाद्यपदार्थ उपलब्ध करून दिले जातात. त्यामुळे शेती व मजुरी करत करता दुग्ध व्यवसाय करता येतो, असा ठाम विश्वास या युवकांच्या मनात ठसला आहे. उच्च शिक्षण घेऊनही मुलांना नोकरी मिळेल का? असा प्रश्न ग्रामीण भागातील पालक वर्गाला पडतो.सरकारी खात्यात रिक्त पदे कमी असतात. यामुळे अनेकांना शासकीय नोकरीपासून वंचित राहावे लागते. खासगी कंपनीत पगार कमी दिला जातो. त्याऐवजी शेतीमध्ये व दुग्ध व्यवसायामध्ये आपण जास्त पैसे कमवू शकतो. त्यासाठी सुशिक्षित बेरोजगारांना कर्ज पुरवठाही उपलब्ध आहे.- प्रशांत घरबडेएमबीए, सुशिक्षित बेरोजगार