लोकमत न्यूज नेटवर्क
संख : सोरडी (ता. जत) येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन एकाचा मृत्यू झाला. सिद्धू भैरू गावडे (वय १९, रा. सोरडी), असे त्याचे नाव आहे. राजाराम दादासाहेब वाकसे जखमी झाला आहे. सोमवारी सकाळी साडेआठ वाजता हा अपघात झाला.
सोरडी-गुड्डापूर रस्त्यावर दत्त मंदिराजवळ अपघात झाला. सिद्धू गावडे दुचाकीवरून (एमएच १० एएक्स ७७१८) चुलते महादेव यशवंत गावडे यांच्यासोबत माडग्याळला निघाले होते, तर राजाराम वाकसे दुचाकीवरून (एमएच १० डीडी ९६६४) सोरडीला दूध घालण्यासाठी जात होते.
सोरडी-गुड्डापूर रस्त्याने चारचाकी गाडी जात होती.
गाडीला ओव्हरटेक करताना वाकसे व गावडे यांच्या दुचाकींची समोरासमोर धडक झाली. त्यामध्ये मागे बसलेला सिद्धू गावडे रस्त्यावर पडला. त्याच्या डोक्याला मार लागला.
त्याला जतला तातडीने नेण्यात आले; पण डोक्याला जबर मार लागून मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दुसरा दुचाकीस्वार राजाराम वाकसे किरकोळ जखमी झाला आहे.
एकुलता एक मुलगा
सोरडी येथील भैरू गावडे दरीबडची रस्त्यालगतच्या आरोग्य उपकेंद्राजवळ पत्नी, मृत मुलगा सिद्धू, दोन मुलींसह राहतात. मृत सिद्धूचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. लष्करात भरतीसाठी तो कोल्हापूर येथील अकॅडमीत होता. लाॅकडाऊनमध्ये गावाकडे आला होता. एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.