सांगली : जिल्हा परिषदेची शुक्रवारची (दि. २२) सर्वसाधारण सभा वादळी ठरण्याची शक्यता आहे. निधीच्या पळवापळवीवरून सदस्यांमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत, त्याचे पडसाद सभेत उमटण्याची चिन्हे आहेत.
निधी वाटपावरून सत्तारूढ गटातच दुफळी निर्माण झाली आहे. मंगळवारी स्थायी समितीच्या सभेत सदस्यांमध्ये चांगलीच चकमक झाली होती, तिचे प्रतिबिंब सर्वसाधारण सभेत उमटण्याची शक्यता आहे. डोंगरी विकास निधीसाठी आग्रही असणारे बांधकाम सभापती जगन्नाथ माळी यांनी निधीसाठी स्थायीच्या सभेतून बाहेर पडणे पसंत केले होते. सुमारे पन्नास लाखांच्या वाटपाचा विषय प्रतिष्ठेचा ठरला आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्षही निधीसाठी ठाम असल्याने स्थायी सभेत कोंडी निर्णाण झाली. माळी यांनी निषेध नोंदवीत सभात्याग केल्याने कोंडी फुटली नाही. याचा निकाल आता सर्वसाधारण सभेत लागेल.
----------