शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
3
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
4
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
5
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
6
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
7
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
8
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
9
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
10
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
11
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
13
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
14
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
15
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
16
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
17
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
18
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
19
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
20
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?

चार ग्रामपंचायतींमध्ये १० लाखांचा अपहार

By admin | Published: July 01, 2016 10:53 PM

परीक्षणात प्रकार उघडकीस : तत्कालीन ग्रामसेवकावर मेढा पोलिसांत गुन्हा नोंद

मेढा : महाबळेश्वर तालुक्यातील येरणे, देवसरे, सोनाट व आचळी या गावांना मिळालेल्या शासनाच्या १० लाख ६ हजार ३२१ रुपयांच्या ग्रामनिधीचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन ग्रामसेवक जगदीश नारायण साळुंखे (रा. बोरगाव, ता. सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी साळुंखेला अटक केली आहे. याप्रकरणी महाबळेश्वर पंचायत समितीचे विस्ताराधिकारी सिकंदर शेख यांनी मेढा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. स्थानिक निधी लेखा परीक्षण कार्यालयाने केलेल्या तपासणीत ही बाब उघडकीस आली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जगदीश साळुंखे दि. ४ जुलै १९९९ ते ३१ मार्च २००५ या कालावधीत संबंधित गावांचे ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते. या कालावधीत साळुंखेकडे येरणे ग्रामपंचायतीचा दि. १८ जुलै १९९९ ते ६ जुलै २००४, सोनाट ३ जुलै १९९९ ते ३१ मार्च २००५ कार्यभर होता. तसेच देवसरे व आचळी या ग्रामपंचायतींचाही कार्यभार होता.या ग्रामपंचायतींना ग्रामनिधी प्राप्त झाला होता. या ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीचे लेखा परीक्षण स्थानिक लेखा निधी विभागाचे लेखा परीक्षण अधिकारी पी. बी. कुलकर्णी, उपमुख्य लेखा परीक्षक पवार, वाघमारे व सहकाऱ्यांनी केले. त्यावेळी या निधीच्या वाटपात अपहार झाल्याचे निष्पन्न झाले. शासनाच्या ग्रामनिधीचा अपहार केल्याप्रकरणी जगदीश साळुंखेवर गुन्हा नोंद झाला आहे. मेढा पोलिसांनी अटक केली असून, दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. सहायक पोलिस निरीक्षक समाधान चवरे तपास करीत आहेत. (प्रतिनिधी) दप्तर तपासणीसाठी दिले नाही...नळपाणी पुरवठा योजना, जवाहर रोजगार योजना, गळती काढणे, मूल्यांकनाशिवाय खर्च आदींबाबात अपहार केल्याचे आढळून आले. संबंधित रकमेच्या पूर्ततेबाबत साळुंखेनी टाळाटाळ केली. तसेच दप्तर तपासणीसाठी उपलब्ध करून देण्यात आले नाही, असे तक्रारीत म्हटले आहे.