शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
2
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
3
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
4
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
5
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
6
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
7
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
8
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
9
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
10
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
11
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
12
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
13
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
14
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
15
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
16
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात
17
Narendra Modi : "ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात
18
आता मनोज जरांगे यांचा भाऊही आंदोलन करणार, मुख्यमंत्र्यांना भेटून दिला इशारा
19
‘लाडकी बहीण’पेक्षा कांद्याला भाव द्या, भाजपा-काँग्रेसला उखडून फेकायचे दिवस आलेत: बच्चू कडू
20
"धर्माच्या नावाखाली गरिबांच्या पोरांचा बळी देऊ नका", निवृत्ती महाराजांचं कळकळीचं आवाहन, कीर्तन चर्चेत

दक्षिण अफ्रिकेतील कॉम्रेड्स अल्ट्रामॅरेथॉनमध्ये सातारकरांचा डंका, १० जणांना यश

By प्रगती पाटील | Published: June 12, 2023 7:17 PM

कॉम्रेड्स अल्ट्रामॅरेथॉन ही जगातील सर्वात जुनी आणि खडतर अल्ट्रामॅरेथॉन

सातारा : दक्षिण अफ्रिकेतील अतिशच आव्हानात्मक व खडतर अशी कॉम्रेड्स अल्ट्रामॅरेथॉन स्पर्धेमध्ये १३ सातारकरांनी सहभाग घेतला. यातील दहा जणांनी घवघवीत यश संपादन करत साताऱ्याचा अटकेपार झेंडा फडकावला. तब्बल ८७.७ किलोमीटरची असणारी ही मॅरेथॉन पहिल्या प्रयत्नात पूर्ण करण्याबरोबरच मेडल मिळवूनही नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे.याबाबत अधिक माहिती अशी ११ जून २०२३ रोजी साऊथ आफ्रिकेत कॉम्रेड्स अल्ट्रामॅरेथॉन पार पडली यात साताऱ्याचे पहिले आर्यनमॅन डॉ. सुधीर पवार, फलटणचे डॉ. रविंद्र शिंदे, महादेव लेंभे, सुभाष भोसले, डॉ. देवदत्त देव व डॉ. अश्विनी देव, विनय रावखंडे, दीपक राव, विठ्ठल अरगडे व शिवाजीराजे गालिंदे, जयंत शिवदे, डॉ. संतोष यादव व मिलिंद हळबे सहभागी झाले होते.कॉम्रेड्स अल्ट्रामॅरेथॉन ही जगातील सर्वात जुनी आणि खडतर अल्ट्रामॅरेथॉन आहे. ही ८७.७ किलोमिटरची रेस आहे. पीटरमारित्झबर्ग येथे सुरू होणारी ही मॅरेथॉन डर्बन येथे संपते. पहाटे साडेपाच वाजता सुरू होणारी ही अल्ट्रामॅरेथॉन संध्याकाळी साडेपाचला संपते. जगभरातून २० हजार तर भारतातून ४०३ धावपटू या कॉम्रेड्स अल्ट्रामॅरेथॉन साठी सहभागी झाले होते. ४ डिग्री सेल्सिअसचे सुरुवातीला असणारे तापमान नंतर वाढत गेले. मॅरेथॉनच्या या रूटवर मोठे मोठे ५ डोंगर आणि अनेक लहान डोंगर पालथे घालयाचे असातात. डॉ सुधीर पवार यांना ५० किलोमीटर पायाला गोळे येवू लागले. त्यामुळे थोडे थांबून पळून ही स्पर्धा त्यांनी ९ तास १५ मिनिटांत पूर्ण केली. अतिशय थकलेले असतानाही जिद्द न सोडता त्यांनी ही मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण केली.सातारा रर्नरर्स फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. संदीप काटे, अध्यक्ष जितेंद्र भोसले, उपाध्यक्ष निशांत गवळी, रेस डायरेक्टर अभिषेक भंडारी, सचिव डॉ. रंजिता गोळे आदींनी यशस्वी धावपटूंनी कौतुक केले.

सातारकरांच्या यशाचा आलेखसाताऱ्याचे पहिले आयर्नमॅन असलेले डॉ. सुधीर पवार यांनी ९ तास ३० मिनिट या वेळेत पहिल्याच प्रयत्नात रॉबर्ट मिशाली मेडल मिळवून साताºयासाठी नवीन विक्रम प्रस्थापित केला. फलटणच्या डॉ रविंद्र शिंदे यांनीही ९ तास ३६ मिनिटांची वेळ नोंदवित रॉबर्ट मिशाली मेडल मिळविले. महादेव लेंभे व सुभाष भोसले यांनी पहिल्याच प्रयत्नात ब्राँझ मेडल (सब ११) मिळविण्याचा पराक्रम केला. डॉ. देवदत्त देव (ब्राँझ मेडल) व डॉ. अश्विनी देव या जोडीने सलग दोन वेळा कॉम्रेड्स मॅरेथॉन पूर्ण करणारी साताऱ्याची पहिली जोडी होण्याचा बहुमान मिळविला. याशिवाय विनय रावखंडे, दीपक राव, विठ्ठल अरगडे व शिवाजीराजे गालिंदे या सर्वांनी उत्तम वेळ नोंदवित कॉम्रेड्स पूर्ण केली.

जगातील सर्वात जुनी आणि खडतर अशी ओळख असणारी कॉम्रेड्स अल्ट्रामॅरेथॉन स्पर्धेत सातारकरांनी मिळविलेले यश निश्चितच अभिमानास्पद आहे. सातारा हिल मॅरेथॉनबरोबरच सातारकर धावपटूही आंतरराष्ट्रीय पातळीवर यशस्वी होत असल्याने साताºयाची नवी ओळख जगभरात होत आहे. - डॉ. संदीप काटे, धावपटू

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMarathonमॅरेथॉन