पळशी : सातारा येथे दि. ३ आॅक्टोबर रोजी निघणाऱ्या मराठा महामोर्चाची माण तालुक्यातील मार्डी गावात जय्यत तयारी सुरू झाली आहे. आतापर्यंत महामोर्चाच्या नियोजनाच्या गावपातळीवर दोन बैठकाही झाल्या आहेत तर सोमवारी निघणाऱ्या महामोर्चाबाबत मार्डी येथील कृषीतीर्थ अॅग्रो सर्व्हिसच्या मराठा मोर्चा संपर्क कार्यालयात महामोर्चासंबंधी नियोजन बैठक घेण्यात आली. यावेळी मनोज पोळ, शिवाजी पोळ, दत्ताजी पोळ, नारायण पोळ, योगेश पोळ, सागर काळे, अभय पोळ, विक्रम पोळ, अमीर मुलाणी, प्रशांत पोळ, सुनील पोळ, रत्नदीप शिंदे, गणेश काळे, बाळू राऊत, राजू पाटील, सचिन काळे, मनोज डुबल, पंकज पोळ आदी उपस्थित होते. गावातील व परिसरातील राजकीय गटतट बाजूला ठेवून सर्वच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, सर्वसामान्य नागरिक, युवक, युवती, महिला, तरुण बांधव या महामोर्चामध्ये सामील होणार आहेत. या मराठा क्रांती महामोर्चामध्ये इतर समाजाच्या नागरिकांनी सहभाग घेण्याचे व्यक्त केले आहे. त्याच बरोबर दि. ३ आॅक्टोबर रोजी मार्डी बंदची हाक देण्यात येणार आहे. मार्डी परिसरात वाड्या-वस्त्यांवर देखील मराठा समाज एकत्र येत नियोजनाच्या बैठका सुरू आहेत. सध्या बाजरीची सुगी असल्याने मागील पंधरा दिवसांपासून महामोर्चात सहभागी होण्यासाठी शेतातील कामे उरकण्याची धांदल पाहावयास मिळत आहे. तर व्हॉट्सअॅपच्या माध्यमातूनही नियोजन होताना दिसत आहे.महामोर्चाबाबतचे फलक झळकत आहेत. दरम्यान, मनोज पोळ यांनी मार्डीत मराठा मावळ्यांना टी-शर्टचे वाटप केले. (वार्ताहर)वाड्या-वस्त्यांवर चर्चा महामोर्चाचीचमार्डीतून तसेच वाड्या-वस्त्यांवरील सुमारे दोन हजारांहून अधिक मराठा समाजबांधव महामोर्चात सहभागी होणार असून, यामध्ये महिला व तरुणींचा सहभाग लक्षणीय आहे. यासाठी मार्डीतून सुमारे दीडशे दुचाकी तर पंचवीस ते तीस टेम्पो, ट्रकचे नियोजन करण्यात आले आहे. वाहनांच्या सुविधेसाठी मराठा समाज स्वयंस्फूर्तीने वर्गणी जमा करत आहेत. त्यामुळे मार्डी परिसरात महामोर्चाच्या नियोजनाला उधाण आले आहे. महामोर्चास सोनार, नाभिक, मुस्लीम तसेच माळी समाजाने पाठिंबा दर्शविला आहे.
दुचाकीवरून मावळ्यांचा शंभर किमीचा प्रवास
By admin | Published: October 01, 2016 12:04 AM