शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

कोयना पायथा वीजगृहातून १०५० क्यूसेक विसर्ग सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 4:37 PM

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस कमी असून, शुक्रवारी सकाळपर्यंत कोयनेला ५, नवजा येथे ८ आणि महाबळेश्वरला ९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर कोयना धरणात आवक कमी झाल्याने दरवाजातून पाणी सोडणे बंद असून, पायथा वीजगृहातून फक्त १०५० क्यूसेक विसर्ग सुरू आहे. पाणी आवकवर धरणातील विसर्ग अवलंबून आहे.

ठळक मुद्देकोयना पायथा वीजगृहातून १०५० क्यूसेक विसर्ग सुरू दरवाजे बंदच : आवकवर पाणी सोडण्याचा निर्णय अवलंबून

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस कमी असून, शुक्रवारी सकाळपर्यंत कोयनेला ५, नवजा येथे ८ आणि महाबळेश्वरला ९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर कोयना धरणात आवक कमी झाल्याने दरवाजातून पाणी सोडणे बंद असून, पायथा वीजगृहातून फक्त १०५० क्यूसेक विसर्ग सुरू आहे. पाणी आवकवर धरणातील विसर्ग अवलंबून आहे.जिल्ह्याच्या पूर्व भागात मागील काही दिवसांत चांगला पाऊस झाला. त्यामुळे तलावात चांगला पाणीसाठा झाला आहे. तर ओढे वाहून बंधारे भरले आहेत. पूर्व भागात सध्या पीक काढणी सुरू असतानाच पाऊस पडू लागला आहे. या तुलनेत पश्चिमेकडे पाऊस कमी आहे.

मागील २० दिवसांत पश्चिम भागात तर तुरळक स्वरुपातच पाऊस पडला. मात्र, मंगळवारी आणि बुधवारी पश्चिम भागातील कोयना, नवजा, महाबळेश्वर, तापोळा, कास, बामणोली या भागात चांगला पाऊस झाला. त्यामुळे कोयना धरण भरले. मंगळवारी मध्यरात्रीपासून कोयना धरणातून पाण्याचा पुन्हा विसर्ग सुरू करण्यात आला.

मात्र, गुरुवारी सायंकाळी धरणाचे दरवाजे बंद करून विसर्गही थांबविण्यात आला. तर शुक्रवारी पहाटेच्या सुमारास धरणाच्या पायथा वीजगृहातील विसर्ग कमी करण्यात आला. २१०० वरून १०५० क्यूसेक विसर्ग सुरू होता. तर धरणात १०५.१४ टीएमसी पाणीसाठा होता. पावसाच्या स्थितीवर धरणातून पाणी सोडण्यात येत आहे.दरम्यान, कोयनानगर येथे शुक्रवारी सकाळपर्यंत ५ मिलिमीटर पाऊस झाला. तर यावर्षी जूनपासून आतापर्यंत कोयनेला ४३११ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर नवजाला ८ तर यावर्षी आतापर्यंत ४९९८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्याचबरोबर महाबळेश्वरला सकाळपर्यंतच्या २४ तासांत ९ आणि जूनपासून ४९६१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, सातारा शहरासह परिसरात पावसाची उघडीप कायम आहे. दिवसभर ढगाळ वातावरण कायम असते.

टॅग्स :Koyana Damकोयना धरणSatara areaसातारा परिसर