शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
4
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
5
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
6
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
7
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
8
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
9
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
10
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
11
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
12
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
13
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
14
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
15
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
16
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
17
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
18
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
19
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
20
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."

वाटिकेत फुलली नरक्याची ११ हजार रोपे

By admin | Published: June 04, 2015 10:32 PM

पाटण वनविभागाचा कार्यक्रम : यावर्षी ८२ हजार रोप लागवडीचे नियोजन --जागतिक पर्यावरण दिन

पाटण : पाटण वनविभागाने यावर्षीच्या पावसाळी हंगामाचा फायदा उठविण्यासाठी सुमारे ८५८२५ रोपांची लागवड करण्याचे नियोजन केले असून विविध जातींच्या वृक्ष लागवडीमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या नरक्या (अमृता) या औषधी वनस्पतींची ११ हजार रोपे रासाटी येथील रोपवाटिकेत तयार केली आहेत. यापूर्वी पाटण वनविभागाने पाचगणी येथील वनक्षेत्रात १५ हेक्टर जमिनीत नरक्या या वनस्पतीची लागवड केली आहे.पाटण वनविभागाच्या अखत्यारित तालुक्याचे एकूण १२ हजार ७७५ हेक्टर वनक्षेत्र असून, मल्हारपेठ, बहुले, चाफळ, पाटण, कारवट, मोरागिरी, गोवारे, पाचगणी, होरोशी, धायटी, तारळे अशी बारा बीट आहेत. पाटण विभागाचे खास वैशिष्ट्य हे कोयना येथील रासाटी रोपवाटिका असून त्याठिकाणी सध्या अडीच लाख रोपे आहेत. इत्यादी औषधी वनस्पतींच्या रोपांची निर्मिती केली आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात धायटी, कारवट, बहुले येथे प्रत्येकी २७५२५ रोपांची लागवड करण्यात येणार आहे. यापूर्वी तीन वर्षांत केलेल्या वृक्षलागवडीमध्ये बोडकेवाडी येथील प्लॅन्टेशन नजरेत भरण्यासारखे तयार झाले असून गाळपट्टे काढणे, प्रतिबंधक उपाय, मातीची भर घालणे इत्यादी कामे वनकर्मचाऱ्यांनी केली आहेत. तालुक्यातील सोनाईचीवाडी, सडावाघापूर, बहुले, पाचगणी, धायटी, नुने, मळरोशी, वाटोळे येथे यापूर्वी विभागाच्यावतीने केलेली वृक्षतोड जीवंत आहे. (प्रतिनिधी) पाटण वनविभागाचे मनुष्यबळ वनक्षेत्रपाल जी. एन. कोले यांच्या देखरेखीखाली ४ वनपाल, १३ वनरक्षक, १७ वनमजूर, १ लिपिक असा स्टाफ असून अजूनही बरीच पदे रिक्त आहेत.गवा हल्ल्यातील जखमींना मदतशिवंदेश्वर येथे गवारेड्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तुकाराम दगडू बावधाने यांना १ लाखांची आर्थिक मदत देण्यात आली. ही घटना २६ जुलै २०१३ रोजी घडली होती. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मनुष्यहानी झाल्यास ८ लाखांची मदत दिली जाते. वन्य प्राण्यांकडून झालेली शेतीपिकांची नुकसान भरपाई २०१२-१३८०२ प्रकरणे १६ लाख ७३६ (नुकसान भरपाई)२०१३-१४ ८३६ प्रकरणे१६ लाख ८ हजार (नुकसान भरपाई)२०१४-१५३३४ प्रकरणे४ लाख ६६ हजार (नुकसान भरपाई)