वरकुटे-मलवडी : माण तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांनी दहा हजारांचा टप्पा ओलांडला असून, त्यापैकी नऊ हजार रुग्ण बरे झाले आहेत, तर सध्या तालुक्यात एक हजार पन्नास रुग्ण उपचार घेत आहेत. तालुक्यातील बारा गावे कोरोनावर मात करून कोरोनामुक्त झाली आहेत, तर १५ गावांत फक्त एकच रुग्ण सध्या उपचार घेत आहे.
माण तालुक्यातील तोंडले, वारुगड, अनभुलेवाडी, भाटकी, धामणी, कोळेवाडी, हस्तनपूर, दोरगेवाडी, स्वरूपखानवाडी, दिवड, चिल्लारवाडी, जांभुळणी ही बारा गावं पूर्णपणे कोरोनामुक्त झाली आहेत. मात्र, म्हसवड १२२, दहिवडी १००, बिदाल ९४, मार्डी ४६, पळशी ४०, आंधळी ३७, वावरहीरे ३६, गोंदवले बुद्रुक ३४, देवापूर २४, शिंदी खुर्द २४, गोंदवले खुर्द २१, मलवडी १८, खुटबाव १५, वरकुटे-मलवडी १५, हिंगणी १५, बोराटवाडी-बोडके १४, ढाकणी १४, कुरणेवाडी १४, गटेवाडी १४, शिंगणापूर १३, राणंद १३, परकंदी १२, कुकुडवाड १२, पाचवड १२, इंजबाव ११, पळसावडे ११, बनगरवाडी ११, वडगाव ११, जाशी ११ तर भालवडी येथे १० रुग्ण आहेत, तसेच कारखेल येथे १०, थदाळे ९, विरळी ९, किरकसाल ८, वडजल ८, वळई ८, सोकासन ७, वर-म्हसवड ७, काळेवाडी ७, दिवड ७, पिंगळी खुर्द ६, खडकी ६, पुळकोटी ६, भांडवली ६, पिंगळी बुद्रुक ६, सत्रेवाडी ६, पर्यंती ६, राजवडी ५, नरवणे ५, शिंदी बुद्रुक ५, शेवरी ५, पळसावडे ५, मोही ५, पांगरी ५, मोगराळे ४, वाघमोडेवाडी ४, दानवलेवाडी ४, डांगिरेवाडी ४, संभुखेड ४, कासारवाडी ४, काळचौंडी ४, टाकेवाडी ३, देवापूर ३, पानवन ३, शिरताव ३, शेणवडी ३, वाकी ३, श्रीपालवन ३, कुळकजाई २, पाचवड २, हवालदारवाडी २, पाणवन २, जाधववाडी २, पिंपरी २, दीडवाघवाडी २, रांजणी २, तर गंगोती येथे सध्या २ कोरोना रुग्ण आहेत.
लोधावडे, पुकळेवाडी, बिजवडी, पांढरवाडी, शिरवली, बोथे, येळेवडी, धूळदेव, पांढरवाडी, मनकर्णवाडी, परकंदी, उकिर्डे, महिमानगड, महाबळेश्वरवाडी या ठिकाणी मिळून १,०४८ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. तालुक्यात आतापर्यंत २३६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यूही झाला आहे.