शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्टिकल 370 वरून जम्मू-काश्मीर विधानसभेत गदारोळ, हाणामारी अन् पोस्टरही फाडलं; बघा VIDEO
2
"प्रमोद महाजनांच्या हत्येमागं मोठं षडयंत्र, दोन्ही भावांमध्ये भांडण नव्हतं"; पूनम महाजनांचे मोठं वक्तव्य
3
"त्रेता युगात इस्लाम नावाची कुठली वस्तूच या पृथ्वीवर नव्हती..."; अमरावतीत काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
4
२०१९ मधील वचननामा, संकल्पपत्र, जाहीरनामा; किती घोषणा पूर्ण झाल्या? तुम्हीच ठरवा
5
Bigg Boss 18: 'वीकेंड का वार'मध्ये दिसणार नाही भाईजान, सलमानच्या जागी 'हे' दोन सेलिब्रिटी असणार होस्ट
6
श्रेयस अय्यरचे द्विशतक! मुंबईचा संकटमोचक सुस्साट; अजिंक्य रहाणेच्या संघाने धावांचा डोंगर उभारला
7
"उद्धवजी नेता घरात नाही, तर लोकांच्या दारात शोभून दिसतो"; बावनकुळेंनी ठाकरेंना डिवचलं
8
धुळे जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात सर्व पक्षांना मत विभाजनाची भीती
9
Chitra Wagh : “राहुल गांधी तुम्हाला संविधान म्हणजे पोरखेळ वाटला का?”; भाजपाच्या चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल
10
मविआतील नेत्यांच्या फोटोंचा वापर; शेकाप उमेदवारावर गुन्हा नोंदवण्याची मागणी!
11
“महाराष्ट्राला परिवर्तन हवे, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे काम करावे लागेल”: शरद पवार
12
जंगल थीम, केक अन्...; आलिया-रणबीरच्या लेकीचा दुसरा वाढदिवस, राहाच्या बर्थडे पार्टीतील Inside फोटो
13
अर्जुन कपूर करतोय एकटेपणाचा सामना? मलायकाशी ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच स्पष्ट बोलला
14
"अमेरिकन जनतेसाठी कमला हॅरिस चॅम्पियन आहेत, कायम राहतील"; जो बायडेन यांनी केलं कौतुक
15
"जिवंत राहिले तर जरूर कोर्टात जाईन", वॉरंट मिळाल्यानंतर प्रज्ञा सिंह ठाकूर यांची पोस्ट!
16
"मित्रपक्षाने अशी दगाबाजी करणं..."; भास्कर जाधवांना संताप अनावर, काँग्रेसला सुनावलं
17
राज ठाकरेंच्या मनसेला आम्ही ऑफर दिली होती, पण...; CM एकनाथ शिंदेंचा दावा
18
ऑस्ट्रेलियात Dhruv Jurel नं राखली लाज; संघ अडचणीत असताना हा पठ्ठ्या एकटा लढला!
19
ममता बॅनर्जींचा भाचा पश्चिम बंगालचा पुढील मुख्यमंत्री होणार? अचानक राजकीय चर्चांणा उधाण
20
"तुला जीवाची पर्वा आहे की नाही?”; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने फॅशन डिझायनरला धमकी

राज्यस्तरीय स्पर्धेत साताऱ्यातील १३ शेतकऱ्यांची बाजी; भात, ज्वारी, बाजरी अन् सोयाबीनमध्ये प्रथम

By नितीन काळेल | Published: September 01, 2022 5:46 PM

राज्याच्या कृषी आयुक्तालयाने २०२१-२२ वर्षातील खरीप पीक स्पर्धेचा निकाल जाहीर केला असून यामध्ये सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बाजी मारली आहे.

सातारा : राज्याच्या कृषी आयुक्तालयाने २०२१-२२ वर्षातील खरीप पीक स्पर्धेचा निकाल जाहीर केला असून  यामध्ये सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बाजी मारली आहे. सर्वसाधारण गटात ३० विजेते ठरले. यामधील १३ सातारा जिल्ह्यातील आहेत. तर भात, ज्वारी, बाजरी, सोयाबीनच्या हेक्टरी उत्पादनात जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा राज्यात प्रथम क्रमांक आला आहे.राज्यात पिकाची उत्पादकता वाढण्यासाठी प्रयत्न सुरू असतात. त्यासाठी विविध भागांतील शेतकरी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करुन उत्पादकता वाढ करत असतात. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा गौरव करण्यात येतो. यासाठी राज्याच्या उत्पादनात मोलाची भर पडेल, या उद्देशाने राज्यात पीक स्पर्धा घेण्यात येते.खरीप पिकांसाठी २०२१-२२ वर्षात मूग, उडीद, सोयाबीन, तूर, भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी आणि भुईमूग या १० पिकासाठी स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अधिक प्रमाणात विजेतेपद मिळविले. पीक उत्पादकता हेक्टरी घेण्यात आलेली आहे. त्यानंतर विजेते निश्चित करण्यात आले आहेत.

बाजरीत हेक्टरी १०० क्विंटल उत्पादन...खरीप बाजरी पीक स्पर्धेत तिघेही विजेते शेतकरी हे सातारा जिल्ह्यातील आहेत. यामध्ये प्रकाश गायकवाड यांनी बाजरीचे हेक्टरी १०० क्विंटल उत्पादन घेतले. तर छबन गायकवाड ९३ आणि दशरथ गेंड यांनी ९२ क्विंटल उत्पादन घेतले आहे.

भुईमुगाचे ४९ क्विंटल उत्पादन...भुईमुगात प्रथम क्रमांक सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्याचा आला असून त्याने हेक्टरी ७२ क्विंटल उत्पादन घेतले. तर साताऱ्याच्या शंकर कदम यांनी ४९ तसेच अधिक माने यांनी ४४ क्विंटल उत्पादन घेतले आहे.

ज्वारीत ४६ क्विंटल उत्पादन...ज्वारी पीक स्पर्धेतही सातारा जिल्ह्यातील तिघां शेतकऱ्यांनी बाजी मारली आहे. हे तिघेही एकाच गावचे राहिवशी आहेत. तानाजी यादव यांनी हेक्टरी ४६ क्विंटल उत्पादन घेत प्रथम क्रमांक मिळवला आहे.

पीक स्पर्धेतील जिल्ह्यातील विजेते शेतकरीखरीप मूग :- विजय तात्यासो देवकर. द्वितीय क्रमांक (रा. मोही, ता. माण)- मनोहर शंकर देवकर. तृतीय क्रमांक (मोही, ता. माण)

खरीप सोयाबीन :- सुरेश शंकरराव पाटील. प्रथम क्रमांक (रा. उंडाळे, ता. कऱ्हाड)  - सुहास शंकर कदम. तृतीय क्रमांक (रा. इंदोली, ता. कऱ्हाड)

खरीप ज्वारी :- तानाजी श्रीपती यादव. प्रथम क्रमांक-पांडुरंग आनंदा यादव. द्वितीय क्रमांक- संदीप रामचंद्र यादव. तृतीय क्रमांक (तिघेही रा. गमेवाडी-पाठरवाडी, ता. कऱ्हाड) खरीप बाजरी :- प्रकाश हणमंत गायकवाड. प्रथम क्रमांक (रा. पिसाळवाडी, ता. खंडाळा)- छबन नारायण गायकवाड. द्वितीय क्रमांक (रा. भादे, ता. खंडाळा)- दशरथ नामदेव गेंड. तृतीय क्रमांक  (रा. मनकर्णवाडी, ता.  माण)  

खरीप भुईमूग :- शंकर रामचंद्र कदम. द्वितीय क्रमांक (रा. इंदोली, ता. कऱ्हाड)- अधिक मारुती माने. तृतीय क्रमांक (रा. मानेगाव, ता. पाटण)

भातात १५४ क्विंटल उत्पादन...- साहेबराव मन्याबा चिकणे. प्रथम क्रमांक (रा. सोनगाव, ता. जावळी). चिकणे यांनी भात पिकात हेक्टरी १५४ क्विंटल उत्पादन घेतले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी