सातारा : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी गुरुवारी १ हजार ३०७ उमेदवारी अर्ज दाखल झाले. अर्ज भरण्याचा शुक्रवार हा चौथा दिवस होता, शुक्रवारपर्यंत एकूण २ हजार १३९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. पोटनिवडणुकीसाठी २३ उमेदवारी अर्ज दाखल झाले. जिल्ह्यातील १७१ सार्वत्रिक तर ३८६ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी सध्या अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्ह्यातील निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारांची तालुकानिहाय आकडेवारी अशी : सातारा : ७९३, कोरेगाव : ४८, जावळी : ९७, कऱ्हाड : ६७, पाटण : ७५, वाई : ७२, महाबळेश्वर : ३५, खंडाळा : ३९, फलटण : ४, खटाव : ५, माण : ७२, एकूण : १३०७. आजअखेर २,१३९ पोटनिवडणूक सातारा : ६, कोरेगाव : ०, जावळी : ७, कऱ्हाड : १, पाटण : ३, वाई : ६, महाबळेश्वर : ५, खंडाळा : ५, फलटण : २, खटाव : ११, माण : ३, एकूण : ५०दरम्यान, शनिवार, दि. १७ आक्टोबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. (प्रतिनिधी)कऱ्हाडला सत्तर अर्जकऱ्हाड : तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शुक्रवारी चौथ्या दिवशी ७० उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यामध्ये उंब्रज २४, तांबवे २४, कोपर्डे ६, शिरगाव ५ आणि जखिणवाडी ग्रामपंचायतीसाठी ९ अर्जांचा समावेश आहे.
ग्रामपंचायतींसाठी १३०७ अर्ज दाखल
By admin | Published: October 16, 2015 9:49 PM