सातारा : बळीराजाला शेतीसाठी मदत होण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेल्या पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा १४ वा हप्ता गुरुवारी वितरित करण्यात आला. यामध्ये सातारा जिल्ह्यातील ३ लाख ९३ हजार शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर हे पैसे जमा होत आहेत. तर आतापर्यंत सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत एक हजार कोटीहून अधिक रक्कम मिळालेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी देशातील शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान पेन्शन योजना सुरु केली. वर्षाला ६ हजार रुपये शेतकऱ्याला देण्यात येतात. ही मदत तीन टप्प्यात असते. आतापर्यंत केंद्र शासनाचे १३ हप्ते शेतकऱ्यांना मिळाले होते. गुरुवारी केंद्र शासनाने १४ वा हप्ता वितरित केला आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील ३ लाख ९३ हजार ३३४ शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर लाभ रक्कम वर्ग केली आहे.
शुभवार्ता! सातारा जिल्ह्यातील चार लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी २ हजार जमा
By नितीन काळेल | Published: July 27, 2023 7:10 PM