सातारा : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले असून, गेल्या २४ तासात कोरोनाचे नवे १५ रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे बाधितांची संख्या ६४ वर पोहोचली आहे. तसेच मंगळवारी दिवसभरात १४ जण कोरानातून मुक्त झाले आहेत.जिल्ह्यात एकीकडे कोरोना वाढत असताना दुसरीकडे मात्र अद्याप प्रशासनाकडून कसलेही निर्बंध घालण्यात आले नाहीत. सार्वजनिक ठिकाणी कमीतकमी मास्कसक्ती तरी करणे गरजेचे असल्याचे वैद्यकीय अधिकारी सांगतात. सध्याची रुग्णवाढ कमी असली तरी येत्या काही दिवसात वेगाने रुग्णसंख्या वाढू शकते, असेही मत वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून व्यक्त केले जाते.जून महिन्यातच कोरोनाचे रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. यामध्ये एक दिलासादायक बातमी म्हणजे यातील एकाही रुग्णाला व्हेंटिलेटर अथवा ऑक्सिजनची आवश्यता भासली नाही. केवळ ताप, खोकला आणि सर्दी अशा प्रकारची लक्षणे कोरोनाबाधित रुग्णांमध्ये आढळून येत आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे. त्यामुळे आरोग्य विभागाला मोठा दिलासा मिळत आहे.
corona virus: सातारा जिल्ह्यात कोरोनाचे १५ नवे रुग्ण, बाधितांची संख्या पोहोचली ६४ वर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 5:33 PM