काँग्रेस महासंमेलनाला सातारा जिल्ह्यातून १५ हजार कार्यकर्ते जाणार : देसाई

By नितीन काळेल | Published: December 18, 2023 06:10 PM2023-12-18T18:10:42+5:302023-12-18T18:11:00+5:30

सातारा : राष्ट्रीय काँग्रेसला १३८ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने दि. २८ डिसेंबरला नागपूरला पक्षाचे महासंमेलन होत आहे. यामध्ये ...

15 thousand workers from Satara district will go to Congress General Conference | काँग्रेस महासंमेलनाला सातारा जिल्ह्यातून १५ हजार कार्यकर्ते जाणार : देसाई

काँग्रेस महासंमेलनाला सातारा जिल्ह्यातून १५ हजार कार्यकर्ते जाणार : देसाई

सातारा : राष्ट्रीय काँग्रेसला १३८ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने दि. २८ डिसेंबरला नागपूरला पक्षाचे महासंमेलन होत आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील १५ हजार काँग्रेस कार्यकर्ते सहभागी होण्यासाठी जाणार आहेत, अशी माहिती जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई यांनी दिली. येथील काँग्रेस कमिटीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मनोहर शिंदे, अॅड. श्रीकांत चव्हाण, निवास थोरात, धनश्री महाडिक, रजनी पवार यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

नरेश देसाई म्हणाले, राष्ट्रीय काँग्रेसला एक परंपरा आहे. हा पक्ष आता २८ डिसेंबरला १३८ वर्षे पूर्ण करत आहे. यासाठी नागपूरला महासंमेलन होत आहे. याची पूर्ण तयारी होत आलेली आहे. या संमेलनाला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, खासदार सोनिया गांधी, प्रियंका गांधी, राहूल गांधी हे उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर देश आणि राज्यातील पक्षाचे वरिष्ठ नेते आणि कार्यकर्तेही सहभागी होतील. यासाठी सातारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून एेक ते दोन हजार कार्यकर्ते नेण्याबद्दल नियोजन आहे. तरीही १५ हजार कार्यकर्ते निश्चित सहभागी होतील असा विश्वास आहे. तसेच नागपूरमधील मेळाव्यात राज्य आणि देशातून १० लाख कार्यकर्ते सहभागी होतील असाही अंदाज आहे.

पृश्वीराज चव्हाण यांना उमेदवारी..

पत्रकार परिषदेत सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. युतीत सर्वच पक्ष मतदारसंघावर दावा करतात. तसेच आघाडीत तुम्ही सातारा मतदारसंघ लढविणार का ? असा प्रश्न पत्रकारांनी केल्यावर देसाई यांनी साताऱ्यात आघाडीची बैठक झाली. त्यावेळी पृश्वीराज चव्हाण यांना उमेदवारी द्यावी, अशी आम्ही मागणी केल्याचे सांगितले. तसेच आघाडीत उमेदवारीबाबत काय निर्णय होईल, त्याच्याशीही आम्ही प्रामाणिक राहू, असेही त्यांनी स्पष्टीकरण दिले.

Web Title: 15 thousand workers from Satara district will go to Congress General Conference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.