फलटण : जिल्हा प्रशासनाने रविवारी जाहीर केलेल्या अहवालानुसार फलटण तालुक्यात नवीन १५३ व्यक्तींची कोरोना चाचणी बाधित आली आहे. यामध्ये शहरात ७२, तर ग्रामीण भागात ८१ रुग्ण सापडले आहेत, तर एका बधिताचा मृत्यू झाला आहे. यामुळे फलटण तालुक्यात कोरोनाचा धोका वाढतच चालला असून, ही बाब प्रशासनाची चिंता वाढविणारी आहे.
फलटण तालुक्यात नवीन बाधित १५३ स्पष्ट झाले आहेत. यामध्ये फलटण शहरात ७२ कोरोना पॉझिटिव्ह सापडले. शहरातील बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, लक्ष्मीनगर, मंगळवार पेठ, रविवार पेठ, विद्यानगर, पवार गल्ली, पाचबत्ती चौक, शिवाजीनगर, भडकमकरनगर, मलठण, रिंग रोड, संजीवराजेनगर, विवेकानंदनगर येथे कोरोना रुग्ण आढळून आले.
ग्रामीण भागात कोळकी, जाधववाडी, वडजल, ठाकूरकी, बरड, निंभोरे, शिंदेवाडी, विडणी, उपळवे, झडकबाईचीवाडी, तरडगाव, कापडगाव, सासवड, वाठार निंबाळकर, सुरवडी, मिरढे, चौधरवाडी, आसू, तरडफ, राजुरी, निंबळक, काळज, राजाळे, चव्हाणवाडी, वाखरी, तांबवे, तडवळे, हिंगणगाव, विठ्ठलवाडी, ताथवडा, पिराचीवाडी, सोमंथळी, शेरेचीवाडी या गावांत कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, तर ताथवडा येथील ५८ वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
......................................................................................................