शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
2
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
3
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
4
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
5
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
6
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
7
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
9
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित
10
"तुम्ही राजकारणाची पद्धत बदला!", शशांक केतकरची मतदानानंतरची पोस्ट चर्चेत
11
AR Rahman Net Worth : एका गाण्याची फी ३ कोटी, देश-विदेशात स्टुडिओ; ए.आर.रहमान यांची नेटवर्थ किती?
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
13
तुळजापूरमध्ये अधिकारीच दुसरं बटण दाबायला सांगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल
14
"BCCI नाही, BJP सरकार...!"; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताच्या भूमिकेवर शोएब अख्तरचं मोठं विधान
15
सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
16
Jio युजर्स सतर्क व्हा! तुमच्या एका चुकीमुळे कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागू शकते
17
अमेरिकेसारख्या देशांना कर्जावर नियंत्रण ठेवावं लागेल, आणीबाणीसारख्या परिस्थितीत.., रघुराम राजन यांचा इशारा
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
19
"१०:३० वाजता मतदानाला गेले, फक्त तीनच लोक", रस्त्यांची दुरवस्था दाखवत बॉलिवूड अभिनेत्री म्हणते- "जर तुम्हाला..."
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: 1962 ते 2019... प्रत्येक निवडणुकीत अपक्षांनी किती मते खाल्ली?

टेंभूच्या पाण्यासाठी १६ गावे आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 4:42 AM

मायणी : मायणी परिसरातील १६ गावांना शेतीसाठी टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी मिळावे यासाठी १६ गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले ...

मायणी : मायणी परिसरातील १६ गावांना शेतीसाठी टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी मिळावे यासाठी १६ गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले आहे. या प्रश्नाबाबत प्रत्येक ग्रामपंचायतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यासाठी पत्र तयार केले असून, लवकरच ग्रामस्थांचे शिष्टमंडळ उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे.

सांगली जिल्ह्यातून टेंभू उपसा योजनेचे पाणी सोलापूर जिल्ह्याला जात आहे. दुष्काळी खटाव तालुक्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या कलेढोण गावापासून या योजनेचे पाणी जात असूनही, या भागाला आजपर्यंत या पाण्याचा लाभ कधी मिळाला नाही. याठिकाणी हजारो एकर कोरडवाहू शेती आहे. येथील शेतकरी कमी पाण्यावर येणारी व नगदी पीके घेतात. मात्र सततच्या दुष्काळजन्य परिस्थितीमुळे हातातोंडाला आलेले पीकही अनेकदा वाया जाते. कमी पाण्यावर व माळरानावर येणारे पीक म्हणून प्रारंभी या भागातील शेतकरी द्राक्ष बागांकडे वळाले.

आयुष्यभर कमावलेला पैसा बागेसाठी खर्च केला. त्यातून उदरनिर्वाह व परिसरातील लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी प्रसंगी विकत पाणी घेऊन येथील शेतकरी द्राक्ष बागा जगवत आहेत.

सध्या मोठ्या प्रमाणात द्राक्ष या भागातून निर्यात होत आहेत. मात्र, गेल्या दोन दशकांपासून या भागातील शेतकरी, ग्रामस्थ टेंभू योजनेचे पाणी शेतीसाठी मिळावे यासाठी प्रयत्न करत आहेत. या परिसरात पाण्यासाठी अनेक लहान मोठी आंदोलने झाली ; परंतु शासन दरबारी म्हणावी तशी दखल घेतली जात नाही. त्यामुळे या भागातील कलेढोण, मुळीकवाडी, पाचवड, तरसवाडी, गारुडी, गारळेवाडी, हिवरवाडी, तरसवाडी, ढोकळवाडी, कान्हरवाडी, कानकात्रे, अनफळे पडळ, औतरवाडी, कठरेवाडी या ग्रामपंचायतींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यासाठी लेखी पत्र तयार केले असून लवकरच ही पत्रे घेऊन ग्रामस्थ व शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ अजित पवार भेट घेणार आहे.

चौकट

टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी शेतीसाठी मिळावे यासाठी या भागातील ग्रामस्थांनी राजकारण विरहीत लढा उभारला आहे. त्यामुळे या लढ्याचे सर्वसामान्य ग्रामस्थही नेतृत्व करत आहे. शासनाने याबाबत योग्य व सकारात्मक निर्णय घेणे अपेक्षित आहे तरच या भागाचा विकास होईल.