शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

फाशीच्या वडाला १६१ वर्षे; पाचजणांना दिली होती फाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2018 12:32 AM

स्वप्नील शिंदे।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ब्रिटिशांविरुद्ध पुकारण्यात आलेल्या १८५७ च्या बंडात सहभागी झालेल्या १७ क्रांतिवीरांना लष्करी न्यायमंडळाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मात्र, क्रूर ब्रिटिशांनी पाचजणांना फाशी दिली. सहाजणांना तोफेच्या तोंडी दिले तर आणखी सहाजणांना गोळ्या घातल्या गेल्या होत्या. १६१ वर्षांपूर्वी ८ सप्टेंबर रोजी शाहूपुरी परिसरातील गेंडामाळावर क्रांतिकारकांना आपल्या प्राणाला मुकावे लागले; ...

स्वप्नील शिंदे।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ब्रिटिशांविरुद्ध पुकारण्यात आलेल्या १८५७ च्या बंडात सहभागी झालेल्या १७ क्रांतिवीरांना लष्करी न्यायमंडळाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मात्र, क्रूर ब्रिटिशांनी पाचजणांना फाशी दिली. सहाजणांना तोफेच्या तोंडी दिले तर आणखी सहाजणांना गोळ्या घातल्या गेल्या होत्या. १६१ वर्षांपूर्वी ८ सप्टेंबर रोजी शाहूपुरी परिसरातील गेंडामाळावर क्रांतिकारकांना आपल्या प्राणाला मुकावे लागले; परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हुतात्मा स्तंभाची आज दुरवस्था झाली आहे.ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या साम्राज्यवादी धोरणामुळे देशातील अनेक संस्थाने खालसा करण्यात आला होता. त्यामुळे जनतेमुळे अंसतोष पसरला होता. दरम्यान, १८३८ मध्ये प्रतापसिंह महाराजांना ब्रिटिशांनी पदच्युत केल्यानंतर रंगो बापूजी गुप्ते यांनी अन्यायाविरुद्ध दादमागितली. मात्र निराश होऊन ते परत आले. त्यांनी तात्या टोपे व नानासाहेब पेशवे यांच्या मदतीने १८५७ च्या उठावासाठी माणसे, पैसे व साहित्य मिळविण्यासाठी फिरत होते. त्यांनी पोलिसांत व इंग्रजी सैन्यातफितुरी माजवणे, शस्त्रे गोळा करणे दारूगोळा तयार करणे असे नियोजन केले. मात्र, फितुरीमुळे हा उठाव अयशस्वी झाला.१८५८ च्या आॅगस्टमध्ये तीन जणांचे एक लष्करी न्यायाधीश मंडळ नेमून चौकशी सुरू झाली. रंगो बापूजी सापडले नाहीतच; पण त्यांचा मुलगा सीताराम गुप्तेला बोरगाव येथे पकडण्यात आले. ‘मी बंडात भाग घेतला होता,’ असे त्यांनी उघडपणे सांगितले. याचा खटला १५ मार्च ते २४ मार्च १८५८ पर्यंत चालला. ७ आॅगस्ट १८५८ रोजी पकडलेल्या क्रांतिकारकांची मालमत्ता जप्त करून सर्वांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. ८ सप्टेंबर १८५८ रोजी शिक्षेची अंमलबजावणी झाली.यामध्ये पाचजणांना फाशी, सहाजणांना गोळ्या घातल्या व इतर सहाजणांना तोफेच्या तोंडीदिले.इंग्रजांच्या निर्दयी कृत्यामुळे जेथे १७ क्रांतिवीरांना प्राणास मुकावेलागले. तीच ही हौताम्यभूमीआहे, त्याठिकाणी आज तो ऐतिहासिक फाशीचा वड नाही; पण येणाऱ्या पिढ्यान्पिढ्यांना प्रेरणा देईल, असा हुतात्मास्तंभ आहे. मात्र, प्रशासनाने या ठिकाणी व्यवस्था उपलब्ध न केल्याने त्याची दुरवस्था झाली आहे. सातारकरांनी ८ सप्टेंबर हा दिवस हुतात्म्यांच्या स्मरणार्थ मानावा, यासाठी सामाजिक आणि राजकीय नेत्यांनी पुढाकार घ्यावा, अशी सातारकरांची अपेक्षा आहे.यांना झाली शिक्षानारायण पावसकर सोनार, केशव चित्रे, शिवराम कुलकर्णी, विठ्ठल कोंडी, सीताराम गुप्ते यांना फाशी. मुनजी मंदिर्गे, सखाराम शेट्ये, बाबा गायकवाड, येशा गायकवाड, गणेश कारखानीस, नाना रामोशी यांना तोफेच्या तोंडी देण्यात आले. रामजी चव्हाण, बाबा कानगी रामोशी, नामा रामोशी, शिवाजी पोटाले (पाटोळे) पर्वती पोटाले (पाटोळे), पाटलू येशू यांना गोळ्या घालण्यात आल्या.