सातारा : जिल्'ाने हागणदारीमुक्त आणि स्वच्छतेत नावलौकिक मिळविला असताना आता स्वच्छतेचा महाजागर कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रवचनकार पुढे आले आहेत. त्यासंबंधीची बैठक जिल्हा परिषदेत झाली असून, एकूण १२४ प्रवचनकारांनी उपस्थिती लावली होती. या सर्वांच्या माध्यमातून जिल्'ातील १७६८ गावांत स्वच्छतेचा जागर होणार आहे.
येथील जिल्हा परिषदेत पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, वारकरी साहित्य परिषद आणि सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने स्वच्छतेचा महाजागर कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी बैठक झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी किरण सायमोते, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती वनिता गोरे, वारकरी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष मधुकर दीक्षित, बाबा महाराज गजवडीकर, दीपक दाभाडे महाराज, हणमंत महाराज, किशोर जाधव शेणोलीकर, आनंदराव देसाई, संदीप गबाळे आदी उपस्थित होते.
संजीवराजे म्हणाले, ‘सातारा जिल्'ातील स्वच्छतेच्या बाबतीत समाजातील सर्व घटकांनी योगदान दिलेले आहे. त्यातच सातारा राज्यातील पहिला हागणदारीमुक्त आणि देशातील पहिला स्वच्छ जिल्हा ठरला आहे. यामध्ये ग्रामीण भागातील लोकांबरोबरच प्रवचन आणि कीर्तनकारांचाही सहभाग राहिला आहे. याच जिल्'ातील हैबतबाबांनी पंढरपूरची वारी सुरू करून वारकरी सांप्रदायाला संघटित करण्याचे काम केले. आता याच पद्धतीने राज्य शासनाने प्रवचनकारांना एकत्र करून स्वच्छतेसाठी कार्यक्रम हाती घेतला आहे. प्रत्येक प्रवचनकार २४ गावांत जाऊन संदेश देणार आहे. यामुळे सातारा जिल्'ातही स्वच्छतेबाबत प्रबोधन होणार आहे. या माध्यमातून वैयक्तिक शौचालय वापर, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, पाणी गुणवत्ता, प्लास्टिक बंदी याबाबत लोकांची मानसिकता बदलण्यात येणार आहे.’
यावेळी धनाजी पाटील, अजय राऊत, हृषीकेश शिलवंत, राजेश भोसले, चंद्रकांत देशमुख, राजेश इंगळे, रवींद्र सोनावणे, संजय पवार, नीलिमा सन्मुख आदी उपस्थित होते.बोला पुंडलिकचा गजर...जिल्हा परिषदेतील बैठकीत प्रवचनकारांनी टाळ वाजवत ‘बोला पुंडलीक’चा गजर केला. तसेच यावेळी भजन, पसायदान म्हणण्यात आले. यामुळे जिल्हा परिषदेत धार्मिक वातावरण तयार झाले होते.
सातारा जिल्हा स्वच्छतेत अग्रेसर आहे. प्रवचनकारांनी भजन, भारुड आणि प्रवचनाच्या माध्यमातून ग्रामीण भागात प्रबोधन करून स्वच्छतेची जिल्'ाची परंपरा कायम पुढे घेऊन जावी.-किरण सायमोते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी