फलटण : फलटण तालुक्यातील १८५ जणांचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आला असून, सलग दुसऱ्या दिवशी १८० च्या घरात रुग्णसंख्या गेल्याने तालुक्यात धोका वाढत चालला आहे.
फलटण तालुक्यातील फलटण ९, सोमवार पेठ २, रविवार पेठ ४, मंगळवार पेठ १, गजानन चौक १, बिरदेवनगर ५, नारळी बाग १, बुधवार पेठ ३, सोमंथळी १, मलटण २०, जाधववाडी १ , अलगुडेवाडी २, काळज २, तडवळे १, मारवाड पेठ १, आदर्की ३, रावडी १ , धनगरवाडा १ , संजीवराजेनगर २, निंभोरे ४, जावली १, विडणी ५, गिरवी २, जाधववाडी ३, हिंगणगाव १, हाडको कॉलनी १, तिरकवाडी २, लक्ष्मीनगर १०, कोळकी ६, वाखरी २, वडजल १, वडले २, बोरावके वस्ती १, हनुमाननगर २, वाजेगाव १, ढवळ ३, वाठार निंबाळकर ४, तरडगाव ६, जिंती ३, सासकल १, आळजापूर २, पाडेगाव १, तडवळे १, साखरवाडी ६, चव्हाणवाडी २, हिंगणगाव १, काळज १, सुरवडी २, भांदळी बुद्रुक १, झडकबाईचीवाडी ५, ताथवडे ३, पवारवाडी २, सांगवी ४, राजाळे २, धुळदेव ३, आसू ३, मुळीकवाडी १, चव्हाणवाडी ५, आदर्की खुर्द १, मुंजवडी १, चैधरवाडी ४, मरिआईचीवाडी १, आदंरुड १, जिंती ३, राजुरी १ , गिरवी नाका १, घाडगेमळा १, सोनवडी बुद्रुक १, फरांदवाडी २, गिरवी १ असे एकूण १८५ जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.