सातारा : जिल्ह्यात कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी होत चालले असून शुक्रवारच्या अहवालानुसार १८६ नवीन रुग्ण वाढले तसेच एकाचा मृत्यू झाला असून कोरोनामुक्त २५७ जणांना घरी सोडण्यात आले.
कोरोना विषाणूची जिल्ह्यातील दुसरी लाट ओसरत चालली आहे. मागील १५ दिवसांपासून बाधितांचे प्रमाण कमी-कमी होत चालले आहे तसेच बाधित दरही कमी झाला आहे. सध्या २०० पेक्षा कमी रुग्ण आढळून येत आहेत. शुक्रवारी जाहीर करण्यात आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात कोरोनाचे नवीन १८६ बाधित स्पष्ट झाले आहेत. यामध्ये फलटण तालुक्यात सर्वाधिक ४२ आढळले असून त्यानंतर सातारा तालुका ३८, कऱ्हाडमध्ये नवीन २५ रुग्ण आढधले आहेत. तर सर्वात कमी रुग्ण पाटण तालुक्यात आढळले तसेच उपचारादरम्यान कऱ्हाड तालुक्यातील एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डीसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या २५७ जणांना घरी सोडण्यात आले.
दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ४७ हजार ३३२ बाधित स्पष्ट झाले आहेत. त्याचबरोबर कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या २ लाख ३७ हजार ९०१ झाली आहे तर कोरोनाने ६०८१ जणांचा मृत्यू झाला आहे. सद्य:स्थितीत ५७८९ बाधितांवर उपचार सुरू आहेत.
.................................................... े