सातारा : जिल्ह्यामध्ये कोरोना महामारीने गेल्या आठवड्यापासून पुन्हा डोके वर काढले आहे. शनिवारी चोवीस तासांत तब्बल १८६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेले आहेत.जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा कहर होऊ लागल्याने जिल्हावासीयांसाठी धोक्याची घंटा जाणवू लागलेली आहे. जिल्ह्यात रुग्ण वाढू लागल्याने प्रशासनावरचा ताण वाढू लागलेला आहे. शुक्रवारी जिल्ह्यामध्ये १ हजार ३९३ स्वॅबची तपासणी करण्यात आली. यामध्ये १८६ जण बाधित आढळून आले आहेत.आयसीयू बेड मिळेनातजे रुग्ण कोरोना झाल्याने अत्यवस्थ झाले आहेत, त्यांच्यावर साताऱ्यातील कोविड जम्बो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येते. बाधितांची संख्या वाढून या हॉस्पिटलमधील बेडदेखील कमी पडू लागलेले आहेत. आयसीयूमध्ये बेड मिळावेत, यासाठी सामाजिक कार्यकर्ते, अधिकारी, पत्रकार यांच्याशी संपर्क साधून लोक प्रशासनापर्यंत आपली व्यथा मांडत आहेत.
सातारा जिल्ह्यात कोरोनाचे नवे १८६ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2021 6:13 PM
corona virus Satara- सातारा जिल्ह्यामध्ये कोरोना महामारीने गेल्या आठवड्यापासून पुन्हा डोके वर काढले आहे. शनिवारी चोवीस तासांत तब्बल १८६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेले आहेत.
ठळक मुद्देसातारा जिल्ह्यात कोरोनाचे नवे १८६ रुग्णआयसीयू बेड मिळेनात