शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
5
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
6
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
7
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
8
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
9
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
10
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
11
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
12
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
13
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
14
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
15
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
16
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
17
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
18
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
19
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
20
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?

धानाई मंदिरात २ लाखांची चोरी

By admin | Published: September 23, 2016 11:21 PM

कार्वे : दानपेटीतील रकमेसह मूर्तीवरील दागिने लंपास

कऱ्हाड/कार्वे : महाराष्ट्रासह कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले कऱ्हाड तालुक्यातील कार्वे येथील धानाईदेवीच्या मंदिरात शुक्रवारी पहाटे चोरट्यांनी दानपेटीसह मूर्तीवरील सुमारे दोन लाखांचे दागिने चोरट्यांकडून लंपास करण्यात आले. या घटनेनंतर गावात तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्वे येथे धानाईदेवीचे भव्य मंदिर आहे. नवरात्रोत्सवात या मंदिरामध्ये महाराष्ट्रासह कर्नाटकातील लाखो भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. यंदाचा नवरात्रोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असताना शुक्रवारी पहाटे चोरट्यांनी मंदिराच्या पूर्वेकडील दरवाजाचे कुलूप तोडले. मंदिरात प्रवेश करताच त्यांनी सर्व सीसीटीव्ही फोडले. त्यानंतर दानपेटीचे कुलूप तोडून त्यातील रोकड चोरली. तसेच मंदिराच्या गाभाऱ्याच्या दरवाजाचे कुलूप तोडून मूर्तीवरील सोन्या-चांदीचे दागिनेही लंपास करण्यात आले. धानाईदेवी मंदिरानजीकच्या जाखाई मंदिरातही चोरट्यांनी धुमाकूळ घातला. मंदिराचे कुलूप कटावणीने तोडून मूर्तीवरील दागिने व दानपेटीतील रक्कम त्यांनी चोरली. परिसरातील ग्रामस्थ रात्री दीड वाजेपर्यंत मंदिर परिसरात होते. तसेच त्याठिकाणी स्वच्छता ठेवण्यासाठी एका कर्मचाऱ्याचीही नेमणूक आहे. संबंधित कर्मचारी रात्री दोन वाजेपर्यंत जागा होता. सर्वजण झोपी गेल्यानंतर पहाटे चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केला असावा, अशी शक्यता आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर, निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्यासह पोलिस पथकाने त्याठिकाणी भेट दिली. मंदिरातून सुमारे दोन लाखांचा ऐवज चोरीस गेल्याची माहिती धानाईदेवी ट्रस्टचे विश्वस्त निवासराव थोरात यांनी पोलिसांना दिली. (प्रतिनिधी) श्वान घुटमळले चोरीच्या घटनेनंतर शुक्रवारी सकाळी साताऱ्याच्या श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. श्वान मंदिरातून बाहेर पडल्यानंतर उत्तर बाजूस जाऊन घुटमळले. त्यामुळे तेथून चोरटे वाहनाने पसार झाले असावेत, असा पोलिसांचा कयास आहे.