शहरं
Join us  
Trending Stories
1
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
2
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
3
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
4
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
5
Vinod Tawde: तावडे आलेल्या त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
6
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
7
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
8
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
11
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
12
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
13
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
14
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
15
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
16
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
17
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
18
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
19
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

विसर्जनासाठी २0 लाखांचं तळं!

By admin | Published: September 21, 2015 9:02 PM

सातारा पालिकेची तयारी : प्रतापसिंह शेती फार्ममध्ये प्रशासन युद्धपातळीवर

सातारा : शहरातील सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्ती विसर्जनासाठी सातारा पालिकेने मोठ्या आकाराचं कृत्रिम तळं तयार करण्याचं काम हाती घेतलं आहे. येथील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या असणाऱ्या प्रतापसिंह शेती फार्ममध्ये हे तळं आकार घेत आहे. यासाठी पालिकेला अंदाजे २0 लाखांचा निधी खर्च करावा लागणार आहे. या तळ्यात शहरातील २0 फूटापर्यंतच्या असस्त्र मूर्तीही विसर्जित करता येणार आहेत.शहरातील मंगळवार तळ्यामध्ये सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्ती विसर्जित केल्या जात होत्या. मात्र न्यायालयानेच कान टोचल्याने आता प्रशासनाला ऐतिहासिक तळ्यांमध्ये मूर्ती विसर्जनाला बंदी घालावी लागली आहे. त्यामुळे परंपरेप्रमाणे मंगळवार तळे, मोती तळे या तळ्यांमध्ये गणेश मूर्ती विसर्जन करता येणार नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या सूचनेनुसार सातारा पालिकेने विसर्जनाबाबत पर्यायी उपाययोजना हाती घेतल्या आहेत. पालिकेने गोडाली, हुतात्मा उद्यान व दगडी शाळा अशा तीन ठिकाणी शहराच्या पूर्वेकडील गणेश मूर्ती विसर्जनाची सोय केली होती. आता पश्चिम भागातील घरगुती व संपूर्ण शहरातील सार्वजनिक गणेश मूर्ती विसर्जनासाठी प्रतापसिंह शेती फार्ममध्ये कृत्रिम तळे तयार केले आहे. या कामावर पालिकेचे विविध खात्याचे अधिकारी व ३0 ते ३५ कर्मचारी गेल्या काही दिवसांपासून राबत आहेत. चार पोकलेनच्या माध्यमातून १७५ बाय ४0 फूट आकाराचे तळे खोदण्यात आले आहे. रविवारी मध्यरात्री उशिरापर्यंत हे काम सुरु होते. या तळ्यावर टाकण्यासाठी सुमारे ६४0 मीटर आकाराचा कृत्रिम तळ्यासाठी लागणारा प्लास्टिक कागद आणण्यात आला असून हा प्रचंड मोठा कागद तळ्यामध्ये अंथरण्याचे काम सुरु आहे. पालिकेने या कामाचे कंत्राट दिले असल्याने ठेकेदाराच्या कामगारांसोबतच पालिकेचे ३0 ते ३५ कर्मचारी इथे राबत आहेत. या कामासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर जिल्हा परिषदेनेही मंजुरी दिली आहे. राधिका रस्त्यालगतच हे तळे असून रस्त्याच्या बाजूला गणपती विसर्जनासाठी मचान तयार करण्यात आले आहे. पालिकेने विसर्जनादिवशी एक क्रेन मागविली आहे. ५0 कर्मचारी विसर्जनादिवशी या ठिकाणी कार्यरत असणार आहेत. (प्रतिनिधी) मचाण असुरक्षित...कृत्रिम तळ्यांशेजारी मूर्ती विसर्जनासाठी बांबूपासून मचाण तयार करण्यात आले आहे. हे बांबू तळयाच्या काठाला असणाऱ्या मातीच्या भिंतीत रोवण्यात आले आहे. जास्त वजन पडल्यास ही मचाण तळ्यात कोसळण्याची शक्यता आहे. गणेश विसर्जनासाठी आलेल्या कार्यकर्त्यांसाठीही ते धोकादायक आहे.तळे भरण्यासाठी लागणार ६५ लाख लिटर पाणीप्रतापसिंह शेती फार्ममधील तळे भरण्यासाठी ६५ लाख लिटर पाणी लागणार आहे. शेती फार्ममधील दोन विहिरींतून या तळ्यात पाणी सोडण्यात येणार आहे, तसेच तोडकर, कवारे, औंधकर यांनीही आपल्या विहिरींचे पाणी विसर्जनासाठी देण्याचे मान्य केल्याचे पालिकेतील अभियंता अनंत प्रभुणे यांनी सांगितले. विसर्जनासाठी आता ४ कृत्रिम तळी...सातारा शहरामध्ये आता चार कृत्रिम तळी तयार झाली आहेत. एक तळे गोडोलीतील कर्मवीर बागेत आहे, दुसरे सदरबझारमध्ये दगडी शाळेत, तिसरे हुतात्मा उद्यानात तर चौथे प्रतापसिंह शेती फार्ममध्ये तयार झाले आहे. या तळ्यांमुळे ऐतिहासिक तळ्यांमधील मूर्ती विसर्जन थांबून पाणी दूषित होण्यास प्रतिबंध बसणार आहे.विसर्जनानंतर काय, याबाबत पालिका निरुत्तरमूर्ती विसर्जनानंतर या कृत्रिम तळ्यांचे कारायचे काय?, हा प्रश्न आहे. केवळ मूर्ती विसर्जनासाठी केलेली ही तळी बांधिव नाहीत. त्यातच विसर्जित केलेल्या मूर्तींचे करायचे काय? याबाबतही पालिका निरुत्तर आहे.