शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

सातारा जिल्हा परिषद नोकर भरती; २४४ उमेदवारांना नियुक्ती 

By नितीन काळेल | Published: September 25, 2024 7:24 PM

आतापर्यंत १६ संवर्गांत निवड : ९७२ जागा भरणार, कामाचा ताण कमी होणार 

सातारा : सातारा जिल्हा परिषदेतील विविध २१ संवर्गांतील ९७२ पदांसाठी परीक्षा झाली असून, आतापर्यंत १६ संवर्गांतील २४४ उमेदवारांना समुपदेशनाने नियुक्ती देण्यात आलेली आहे. उर्वरित संवर्गांतीलही पात्र उमेदवारांना लवकरच नियुक्ती मिळणार असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांवरील ताण कमी होणार आहे.सातारा जिल्हा परिषदेकडील विविध २१ संवर्गांत ९७२ पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी ७४ हजार ५७८ उमेदवारांनी अर्ज केला होता. त्यानंतर गेल्या वर्षी १५ ऑक्टोबरपासून ऑनलाइन पद्धतीने सर्व २१ संवर्गांसाठी परीक्षा झाली. त्यानंतर निकालही प्राप्त झाला आहे. तर यामधील १६ संवर्गांतील उमेदवारांना जिल्हा परिषदेच्या वतीने समुपदेशनाने पदस्थापना आणि नियुक्ती आदेश दिला आहे. आता ६ संवर्गाची प्रक्रिया राहिलेली आहे.उर्वरित संवर्गांत आरोग्यसेवक पुरुष ४० टक्के, कंत्राटी ग्रामसेवक यामधील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झालेली आहे. नियुक्ती आदेश कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. कनिष्ठ लेखाधिकारी, आरोग्यसेवक (महिला), आरोग्यसेवक (पुरुष) ५० टक्के अशा तीन संवर्गांतील कागदपत्रे पडताळणी प्रक्रिया झालेली आहे. अंतिम निवड यादीबाबत शासनस्तरावरून मार्गदर्शन मागविण्यात आलेले आहे.

सातारा जिल्हा परिषदेतील २१ संवर्गांतील ९७२ जागांसाठी पदभरती सुरू आहे. आतापर्यंत १६ संवर्गांतील उमेदवारांना जिल्हा परिषदेकडून समुपदेशनाने नियुक्ती आदेश देण्यात आलेला आहे. उर्वरित संवर्गांतीलही पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याची कार्यवाही सुरू आहे. - याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी

टॅग्स :Satara areaसातारा परिसरzpजिल्हा परिषद