पाचगणी : येथील केंब्रिज हायस्कूल या इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेतील २५ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. गुरुवारी दुपारी मुलांना जास्त त्रास झाल्याने शाळा प्रशासनाने त्यांना पाचगणीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले; परंतु काहींना अधिक त्रास होऊ लागल्याने त्यांना सातारा येथे हलविण्यात आले आहे.भिलार येथील केंब्रिज हायस्कूल या इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेतील २५ मुलांना अन्नातून विषबाधा झाल्याचे उघडकीस आले आहे. दुपारी दोननंतर काही मुलांना पोटदुखणे, उलट्या व जुलाबाचा त्रास होऊ लागल्याने शाळा प्रशासन घाबरून गेले. या मुलांना तातडीने पाचगणी येथील कस्तुरबा गांधी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. येथील आरोग्य अधिकाऱ्यांनी या मुलांना तपासले व उपाचार सुरू केले; परंतु काही विद्यार्थ्यांना जास्त त्रास होऊ लागल्याने अधिकाऱ्यानी चार मुलांना सातारा येथील रूग्णालयात हलविण्यास सांगितले. त्यानुसार शाळा प्रशासनाने सर्वच मुलांना सातारा येथे हलविले.शाळा व्यवस्थापनाने मात्र पालकांनी आपल्या मुलांना खाऊ घातलेल्या पदार्थांमधून हा प्रकार घडला असल्याचे स्पष्ट केले असले तरी मुलांना लगेच त्रास व्हायला हवा होता. परंतु स्पोर्टस् डे झाल्यानंतर बऱ्याच कालावधीनंतर हा प्रकार घडला आहे. त्यामुळे ही घटना कोणत्या कारणामुळे घडली याबाबत साशंकता निर्माण होत आहे. (प्रतिनिधी)काही दिवसांपूर्वी शालेय क्रीडा स्पर्धा झाल्या. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचे पालक हजेरी लावतात. बहुतांशी पालक आपल्या मुलांना फूड पॅकेट, खाण्याचे पदार्थ घेऊन येतात. हे पदार्थ खाल्ल्यामुळे मुलांना त्रास झाला असल्याचे वाटते. - मिसेस पोथन, शाळा प्रशासनप्रमुख, मुलांच्या जेवणात मूगडाळीचे वरण सातत्याने व अधिक प्रमाणात आल्याने त्यांना पित्ताचा त्रास जाणवत होता. यामुळे पोट अधिक प्रमाणात फुगण्याचा संभव असतो, तसेच होणारा त्रास लहान मुलांना सहन होत नाही. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही मुलांना जिल्हा रूणालयात अधिक उपचारासाठी पाठविले आहे.- डॉ. पवन दुरगकर, आरोग्य अधिकारी, पाचगणी
केंब्रिज हायस्कूलच्या २५ मुलांना अन्नातून विषबाधा
By admin | Published: February 13, 2015 12:12 AM