शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

सातारा : तलावातील अल्पसाठ्याने घशाला कोरड पडणार , नेर तलावात २५ टक्के साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2018 5:43 PM

खटाव तालुक्यातील अनेक भागांना पावसाने चांगलीच हुलकावणी दिली आहे. त्यामुळे भविष्यात पाण्याचा प्रश्न गंभीर बनणार आहे. तर तालुक्यातील अनेक गावांसाठी वरदान ठरणाऱ्या नेर तलावात केवळ २५ टक्के साठा उपलब्ध आहे.

ठळक मुद्देतलावातील अल्पसाठ्याने घशाला कोरड पडणार , नेर तलावात २५ टक्के साठाखटाव तालुक्यातील लोकांच्या नजरा हस्त नक्षत्रातील पावसाकडे

पुसेगाव : खटाव तालुक्यातील अनेक भागांना पावसाने चांगलीच हुलकावणी दिली आहे. त्यामुळे भविष्यात पाण्याचा प्रश्न गंभीर बनणार आहे. तर तालुक्यातील अनेक गावांसाठी वरदान ठरणाऱ्या नेर तलावात केवळ २५ टक्के साठा उपलब्ध आहे. येळीव, शिरसवडी या दोन तलावांत तर नाममात्र साठा आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण होणार आहे. सध्या फक्त हस्त नक्षत्रातील पावसाकडे शेतकऱ्यांसह लोकांच्या नजरा लागल्या आहेत.खटाव तालुक्यात यावर्षी उन्हाळ्यात समाधानकारक पाऊस पडला नाही. त्यामुळे तालुक्यातील तलावांमध्ये चांगला पाणीसाठा होऊ शकला नाही. परिणामी, या तलावातील पाण्यावर अवलंबून असणारे शेती क्षेत्र तसेच गावोगावच्या पाणी योजना अडचणीत येऊ शकतात. डिस्कळ, मोळ, बुध, ललगुण तसेच राजापूर, वेटणे, रणसिंगवाडी या भागात मोठा पाऊस झाला तरच येणाºया पुरामुळे तलावाच्या पाणीसाठ्यात वाढ होत असते.

यावर्षी खटाव तालुक्यातील तलाव परिसरात तुलनेने मोठ्या स्वरुपातील व वळीव पाऊस कमी पडला. तसेच तलावाच्या वरील भागात मोठ्या प्रमाणात जलसंधारण, जलयुक्त शिवार व वॉटर कपच्या माध्यमातून मोठी कामे झाली आहेत. त्यामुळे नेर व दरुज तलावात आजमितीला केवळ अल्प पाणीसाठा आहे.

अपवाद वगळता काही भागात हलका पाऊस होत असला तरीही तलावात पाणीसाठा होण्यासाठी दमदार पावसाची नितांत गरज आहे. तर सध्याच्या हस्त नक्षत्रात पावसाने जोरदार हजेरी लावली नसल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.नेर तलावातून पुसेगाव, विसापूर, फडतरवाडी, शिंपीमळा, बुध, डिस्कळ, वेटणे यासह अनेक गावांच्या पिण्याच्या पाणी योजना कार्यान्वित आहेत. परंतु आजमितीच्या उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार करता या भागातील जनतेला पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न भेडसावण्याची शक्यता आहे.नेर तलाव १८८६ मध्ये पूर्ण झाला असून, पाणीसाठवण क्षमता ११.८७ दशलक्ष घन मीटर (४१६.४० दशलक्ष घनफूट) ऐवढी आहे. ६५० हेक्टर जमीन क्षेत्रात हा तलाव आहे.

या तलावाचे उद्घाटन राणी व्हिक्टोरिया यांच्या हस्ते झाले होते. पुसेगाव, खटाव, कुरोली सिद्धेश्वरसह येरळवाडीपर्यंच्या जनतेसाठी महत्त्वाचा असलेला हा तलाव तालुक्याच्या ६० टक्के भागाला वरदान ठरलेला आहे.

तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर या पाण्यावर खरीप व रब्बी हंगामातील एक हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र ओलिताखाली येते. मात्र, चालूवर्षी समाधानकारक पाणीसाठा अद्यापही न झाल्याने शेतकरी वर्गात चिंता आहे.खटाव तालुक्यातील तलावांची पाणीसाठवण क्षमता व उपलब्ध पाणीसाठा असातलाव       पाणीसाठवण  क्षमता            उपलब्ध पाणीसाठा (दशलक्ष घनफुटात)नेर                              ४१६.४०                        १२५.१दरूज                         १०१.८८३                         १८.0येळीव                            ७९.९७                      अल्पसाठाशिरसवडी                        ६८.१३                    अल्पसाठामायणी                            ५१.४५                    मृतसाठाकानकात्रेवाडी                    ४३.०८                   मृतसाठासातेवाडी                           ३७.३७                   मृतसाठाडांबेवाडी                            २७.२२४                 मृतसाठापारगाव                             ३८.४७                    मृतसाठा

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018Satara areaसातारा परिसरDamधरण