औंध : येळीव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उद्योजक केशव जाधव यांच्या नेतृत्वाखालील हनुमान ग्रामविकास परिवर्तन पॅनेलने सर्वच सात जागा जिंकून माजी समाजकल्याण सभापती यांच्या २५ वर्षांच्या एकहाती सत्तेला सुरूंग लावत परिवर्तन घडविले.
खटाव तालुक्यातील येळीव ग्रामपंचायत राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानली जाते. तालुक्यातील जनतेचे निवडणुकीत लक्ष लागले होते. माजी समाजकल्याण सभापती यांच्या नेतृत्वाखालील ग्रामविकास पॅनेल आणि उद्योजक केशव जाधव यांचे हनुमान ग्रामविकास परिवर्तन पॅनेलमध्ये लढत झाली. प्रस्थापित नेत्याचे मोठे आव्हान समोर असताना केशव जाधव यांनी सर्वसामान्य जनतेला बरोबर घेऊन सर्वच सातपैकी सात जागा जिंकून परिवर्तन घडवून आणले. जाधव यांनी विरोधकांना व्हाईटवाॅश दिल्याची तालुक्यातील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. हनुमान ग्रामविकास परिवर्तन पॅनेलचे केशव जाधव, सुषमा घार्गे, रुक्मिणी जगताप, अलताफ शेख, शुभांगी जगताप, शामराव सर्वगोड, रेश्मा जाधव हे सदस्य निवडून आले आहेत.
या परिवर्तन पॅनेलच्या विजयासाठी दीपक घार्गे, प्रदीप घार्गे, बाबासो घार्गे, अरविंद घार्गे, संतोष जाधव, सचिन जाधव, अमोल घाडगे, विनोद चव्हाण, आबा चव्हाण, गोरख चव्हाण, शकर जाधव, चंद्रकांत चव्हाण, योगेश भोसले, अमर जगताप, आप्पासाहेब जगताप, दिनेश जगताप, दत्तात्रय जगताप, किरण जगताप, दीपक जगताप, नवनाथ जगताप, अर्जुन जगताप, विलास मोरे, नारायण जगताप, आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
(प्रतिक्रिया)
येळीवचा विजय जनतेला समर्पित...
येळीवच्या जनतेने माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून ग्रामपंचायतीच्या सर्व जागांवर आमच्या पॅनेलचे उमेदवार विजयी करून विश्वास दाखवला आहे. विकासकामाच्या माध्यमातून पुढील काळात लोकांचा विश्वास सार्थ ठरवीन.
-केशव जाधव
२०येळीव
फोटो:- येळीव (ता. खटाव) ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्यांनी विजयाचा जल्लोष केला.