शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांना मोठा दिलासा! 'ट्रम्पेट' चिन्हाचं 'तुतारी' हे मराठी भाषांतर रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय
2
Maharashtra Election: "आम्ही फोडणार नाही, पण करेक्ट कार्यक्रम करणार"; सतेज पाटलांचा इशारा
3
देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती, मनसे महायुतीत येण्याचा सध्यातरी ‘स्कोप’ नाही
4
कसब्यात हिंदू महासंघाचा मनसे उमेदवाराला पाठिंबा; मतदारसंघात मतांचं गणित बदलणार?
5
जगभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी, न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डिंग दिव्यांनी उजळून निघाली
6
सरवणकरांचं कौतुक, राज ठाकरे, बाळा नांदगावकरांवर टीका; ठाकरे गटाचे उमेदवार काय म्हणाले?
7
भाजपचे सर्वात ज्येष्ठ कार्यकर्ते भुलाई भाई यांचे निधन; वयाच्या 111 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
मराठीसाठी लढणाऱ्या पक्षाचे ६ नगरसेवक चोरताना महाराष्ट्रद्रोह नव्हता का?; मनसेचा थेट सवाल
9
मेगा लिलावाआधी प्रीतीच्या PBKS नं केली १०० कोटींपेक्षा अधिक बचत; कुणाच्या पर्समध्ये किती पैसा?
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मनोज जरांगेंच्या रुपात भारताला गांधी, आंबेडकर, मौलाना आझाम मिळतील';सज्जाम नोमानी काय म्हणाले?
11
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
12
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
13
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
15
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
16
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
17
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
19
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल

corona virus updates ins satara-जिल्ह्यात २६ कोरोनाबाधितांचा मृत्यू, १४३४ नवीन बाधित रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 6:32 PM

CoronaVirus Satara : सातारा जिल्ह्यात सोमवारी प्रशासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार १४३४ नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले असून २६ बाधितांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आजअखेर एकूण ९५ हजार ५६ नागरिक कोरोनाबाधित आढळून आलेले आहेत. सातारा तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक आहे तर खटाव तालुक्यातदेखील चिंता वाढविणारे चित्र आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात २६ कोरोनाबाधितांचा मृत्यू, १४३४ नवीन बाधित रुग्णसातारा खटाव तालुके ठरलेत हॉटस्पॉट

सातारा : जिल्ह्यात सोमवारी प्रशासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार १४३४ नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले असून २६ बाधितांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आजअखेर एकूण ९५ हजार ५६ नागरिक कोरोनाबाधित आढळून आलेले आहेत. सातारा तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक आहे तर खटाव तालुक्यातदेखील चिंता वाढविणारे चित्र आहे.जिल्ह्यातील अकराही तालुक्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. एप्रिल महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणदेखील वाढले आहे. जावळी, कऱ्हाड, खंडाळा, कोरेगांव, माण, महाबळेश्वर, पाटण, सातारा, वाई या तालुक्यांमध्ये रविवारच्या तुलनेमध्ये सोमवारी कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली; परंतु खटाव आणि सातारा या दोन्ही तालुक्‍यांत चिंता वाढवणारे चित्र अजून कायम आहे.सातारा तालुक्यात सोमवारी २९५ बाधित आढळले आहेत. रविवारच्या तुलनेत रुग्ण संख्या कमी झाली असली तरीदेखील जिल्ह्यामध्ये सर्वाधिक रुग्ण सातारा तालुक्यात आढळले आहेत. खटाव तालुक्यात रविवारी २६१ रुग्ण आढळले होते. सोमवारी यात आणखी वाढ झालेली आहे. तालुक्यात सोमवारी २७० रुग्ण आढळून आलेले आहेत. सातारा आणि खटाव हे दोन तालुके कोरोनाचे हॉटस्पॉट ठरताना दिसत आहेत.जावळी, खंडाळा आणि महाबळेश्वर या तालुक्यातील कोरोनाबाधितांचे मृत्यू रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. इतर आठ तालुक्यांमध्ये मात्र कोरोनाबाधितांचे मृत्यूसत्र सुरूच आहे. जिल्ह्यात आजअखेर २ हजार ३५५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी दिली.सोमवारी दिवसभरात नवे रुग्ण (कंसातील आकडे एकूण रुग्णांचे)जावळी ७७ (४४०१), कऱ्हाड ७६ (१४७६२), खंडाळा ८७ (५८६१), खटाव २७० (८१०८), कोरेगांव ११८ (८००७), माण १४५ (५४६८), महाबळेश्वर ३८ (३१५८), पाटण ३२ (३८०२), फलटण २०४ (११९८३), सातारा २९५ (२१८००), वाई ८४ (७२३८ ) व इतर ११ (४६८)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर