कऱ्हाड : कोरोना संक्रमण झपाट्याने वाढत असून तालुक्यातील बहुतांश गावे सध्या बाधित आहेत. काही गावांमध्ये रुग्णांची साखळी निर्माण झाली आहे. तब्बल २७ गावे सध्या ‘हॉटस्पॉट’ असून संबंधित गावांमध्ये दहापेक्षा जास्त ‘अॅक्टिव्ह’ रुग्ण आहेत. या गावांवर सध्या प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे.
कऱ्हाड शहरात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. एकीकडे लसिकरणाचा वेग प्रशासनाने वाढविला असताना बाधितांची संख्याही तेवढ्याच गतीने वाढताना दिसते. मलकापुरातही हीच स्थिती आहे. त्याठिकाणी रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्याबरोबरच शहराची उपनगरे असलेल्या सैदापूर, हजारमाची, कोयना वसाहत, वारूंजी परिसरातही चिंताजनक परिस्थिती आहे. सदाशिवगड आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या हजारमाची, ओगलेवाडी, बनवडी या गावांमध्ये रुग्ण वाढल्यामुळे धास्ती निर्माण झाली आहे. काले गावातील रुग्णसंख्या सध्या तीसवर पोहोचली आहे. त्यामुळे गावात शुकशुकाट पसरला आहे. उंब्रज विभागातील उंब्रजसह तासवडे गावाने प्रशासनाची चिंता वाढविली आहे.
तांबवे परिसरात सुपने वगळता इतर गावांमध्ये रुग्णसंख्या कमी आहे. मात्र, सुपने गावात झपाट्याने रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता गावातील इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. कोळे विभागातही काही गावांमध्ये संक्रमण वाढले असून येवती विभागही कोरोनाच्या दहशतीखाली आहे.
- चौकट
एकामुळे कुटुंबच बाधित
शेरे गावामध्ये आठ ते दहा जणांचे कुटुंबच बाधित आढळून आले आहे. संबंधित कुटुंबातील एकजण दररोज कामानिमित्त कऱ्हाडला ये-जा करीत होता. त्याला त्रास सुरू झाल्यामुळे त्याची चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल बाधित आला. त्यानंतर कुटुंबातील सर्वांची चाचणी केली असता सर्वांचेच अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आले आहेत. एकामुळे कुटुंब बाधित होण्याचे शेरेतील हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. तालुक्यातील बहुतांश ठिकाणी अशीच परिस्थिती पहायला मिळत असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी सांगितले.
- चौकट
दहापेक्षा जास्त अॅक्टिव्ह रुग्ण
मलकापूर : १३२
कऱ्हाड : १३९
कोयना व. : १७
काले : २९
तासवडे : २०
उंब्रज : १४
सुपने : १२
सैदापूर : ३६
हजारमाची : २३
बनवडी : १७
विरवडे : १०
कोपर्डे ह. : १३
मसूर : ११
तारूख : १२
कोळे : १३
कोळेवाडी : १२
विंग : १४
गोळेश्वर : २३
शेणोली : १३
वडगाव ह. : १५
कापील : ११
शेरे : २५
कोरेगाव : १९
कार्वे : १८
रेठरे बुद्रूक : १६
शेवाळवाडी : १७
सवादे : १२
- चौकट
गावांचा लेखाजोखा
एकूण बाधित : १८८
कोरोनामुक्त : ६६
कंटेन्मेंटमध्ये : १२१
- चौकट
कोरोना अपडेट
एकूण बाधित : १२१३२
कोरोनामुक्त : १०७०७
दुर्दैवी मृत्यू : ३६२
उपचारात : १०६३
- चौकट
चार महिन्यांतील रुग्णसंख्या
जानेवारी : ८९
फेब्रुवारी : १३८
मार्च : ५९२
एप्रिल : १४३१
(दि. १६ अखेर)
- चौकट
विभागनिहाय रुग्ण
इंदोली : ४४९
उंब्रज : ८३५
मसूर-हेळगाव : ९१९
सदाशिवगड : ११९२
कऱ्हाड : २९१२
सुपने : ६१६
कोळे : ६१९
काले : २१८७
वडगाव हवेली : १६५०
येवती : ७१४