सातारा : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी अनेक इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. इच्छुकांच्या या भाऊगर्दीमुळे सातारा जिल्ह्यात कधी नव्हे इतकी ‘राजकीय मिसळ’ झाल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या मिळून १९२ जागांसाठी साधारणपणे ३ हजार उमेदवारांनी विविध पक्षांकडे उमेदवारीची मागणी केली आहे. राष्ट्रवादीने सर्वात पहिल्यांदा इच्छुकांच्या मुलाखतीचा कार्यक्रम घेतला. तब्बल ७८० इच्छुकांनी मुलाखती दिल्या. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याने साहजिकच जिल्'ातून इच्छुक मंडळी राष्ट्रवादीकडेच आकर्षित झाल्याचे चित्र सुरुवातीला दिसले. परंतु काही दिवसांतच शिवसेनेही घेतलेल्या मुलाखतीच्या कार्यक्रमात तब्बल ६१५ इच्छुकांनी मुलाखती दिल्या. भाजपने तालुकावर घेतलेल्या मुलाखतींमध्ये ३०० जणांनी हजेरी लावली. तर काँगे्रस व शेतकरी संघटना या युतीने घेतलेल्या मुलाखतींसाठी ६०० इच्छुक हजर राहिले होते. काँगे्रस-राष्ट्रवादी असा सामना नेहमीच जिथे गाजतो, त्याच साताऱ्यात आजच्या घडीला भाजप, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना हे केंद्र व राज्यात सत्तेवर असणारे पक्षही ही निवडणूक लढण्यासाठी आग्रही आहेत. (प्रतिनिधी)
१९२ जागांसाठी ३ हजार इच्छुक!
By admin | Published: January 27, 2017 11:13 PM