सातारा : जिल्ह्यात शनिवारी ३०८ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यामध्ये शनिवारी ११ हजार ५७८ तपासण्या करण्यात आल्या होत्या, त्यातून ३०८ रुग्ण आढळले. सातारा तालुक्यात सर्वाधिक ६३ तर त्याखालोखाल फलटण तालुक्यात ५५ रुग्ण आढळून आले आहेत. जावली ११, कऱ्हाड १९, खंडाळा १५, खटाव ४८, कोरेगाव ४३, माण ३१, महाबळेश्वर २, पाटण ६, वाई ९ व इतर ६ असे आज अखेर एकूण २ लाख ४५ हजार ९९३ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.
जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या शनिवारी संध्याकाळपर्यंत ५२६ जणांना घरी सोडण्यात आले असून ७ हजार ९८ रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.